R S S KHOLI ANI VYAOTI आर. एस. एस. ( राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ) BY DEVANURU MAHADRV
आर. एस. एस. ( राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ) या संघटनेचं खरं स्वरूप आणि तिची उद्दिष्टे यांची काटेकोर तपासणी करावी आणि त्यातून येणारे निष्कर्ष लोकांसमोर सादर करावेत यासाठी हा खटाटोप आहे. देशभरातल्या सामान्य लोकांत फूट पाडण्याचा कसून प्रयत्न आर. एस. एस. कसा करते आहे हे लोकांच्या लक्षात आणून देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. आर.एस.एस.बद्दल लोकांचं सार्वत्रिक आकलन किंवा समज आणि तिचं वास्तव अंतरंग यातली दरी बुजविण्याच्या दृष्टीने टाकलेले हे एक पाऊल आहे. आपल्या लोककथांमध्ये एका जादूटोणा अवगत असलेल्या राक्षसाची गोष्ट येते. हा राक्षस दुष्ट, अत्याचारी असतो.
आख्या जगाला त्यानं हवालदिल करून सोडलेलं असतं. हाहा:कार माजविलेला असतो. त्याचा पाडाव करणं अशक्य असतं कारण त्यानं त्याचा प्राण सातासमुद्रांपलीकडं असलेल्या गुहेत एका पोपटाच्या रूपात दडवून ठेवलेला असतो. तो
जादूगार तर असतोच. शिवाय तो बहुरूपीही असतो. त्याला अनेक नव्हे तर अनंत रूपं धारण करता येतात. या सर्व पेचांतून वाट काढून त्याच्याशी लढायचं तर आधी त्याचा प्राण कुठे लपवून ठेवण्यात आला आहे हे निश्चित करणं भाग असतं. त्याचा शोध घ्यायला लागतो. आर. एस. एस ची प्राणशक्ती कोठे आहे याच्या शोधात असताना मी अगदी प्राचीन
सांस्कृतीक सांडपाण्याच्या टाक्यांमध्येही डोकावलो. कारण त्याची प्राचीन पाळंमुळं तेथूनच तर फुटून वर येत होती. मला जे दिसलं ते भयंकर किळसवाणं होतं. त्याचा कसाबसा एक तुकडा या पुस्तिकेतून तुमच्यासमोर येतोय. त्याचं संपूर्ण
दर्शन मांडण्याची प्रेरणा या मुळे कुणाला झाली तर हा सर्व खटाटोप सार्थकी लागला असे मला वाटेल.
-देवानुरू महादेव