Payal Books
Punyachi Samruddh Budhwar Peth By Suprasad Puranik पुण्याची समृद्ध बुधवार पेठ
Couldn't load pickup availability
Punyachi Samruddh Budhwar Peth By Suprasad Puranik पुण्याची समृद्ध बुधवार पेठ
पुणे शहराचे वैशिष्ट्य म्हणजे शहरातील पेठा. त्यातील एक अत्यंत महत्वाची पेठ म्हणजे बुधवार पेठ. बुधवार पेठ एक व्यापारी पेठ होती. आजही तिची ओळख बऱ्यापैकी तीच आहे. कारण अनेक प्रकारच्या गोष्टी खरेदी करण्यासाठी आजही येथेच यावे लागते. पुण्यातील बऱ्याच महत्वाच्या वास्तू, दुकाने, मंदिरे, संस्था, रस्ते, चौक, नाट्य-चित्रपटगृह या बुधवार पेठेत होते आणि आहेत. परंतु बुधवार पेठ म्हटलं की फक्त वेश्यावस्ती आठवते. ही पेठ त्यामुळे थट्टेचा विषय राहिली आहे आणि या पेठेची बदनामी झालेली आहे. इथे जागोजागी इतिहास आहे. तो कोणी समजून घेत नाही, पहात नाही. बुधवार पेठेवर लागलेला हा चुकीचा शिक्का पुसण्यासाठी हे पुस्तक आहे. ऐतिहासिक, वारसासंपन्न, अनेक दृष्टीने समृद्ध असलेल्या या पेठेच्या नाण्याची दुसरी बाजू लेखक श्री. सुप्रसाद पुराणिक यांनी पुण्याची समृद्ध बुधवार पेठ या पुस्तकाद्वारे सर्वांसमोर आणलेली आहे.
