Skip to product information
1 of 2

Payal Books

Pune Shaharacha Itihas By Avinash Sowani पुणे शहराचा इतिहास डॉ. अविनाश सोवनी

Regular price Rs. 1,100.00
Regular price Rs. 1,300.00 Sale price Rs. 1,100.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Pune Shaharacha Itihas By Avinash Sowani पुणे शहराचा इतिहास  डॉ. अविनाश सोवनी

पुणे शहराचा इतिहास हा एक संदर्भ ग्रंथ असून तो डॉ. अविनाश सोवनी यांनी गेली तीस वर्षे केलेल्या पुणे शहराच्या इतिहासाच्या अभ्यासावरून सिद्ध केला आहे.
   सदर ग्रंथ त्यांनी अत्यंत वस्तुनिष्ठ पद्धतीने लिहिला असून त्यात, पुणे शहराच्या इतिहासाची सखोल माहिती तर आहेच, शिवाय त्यांनी अभ्यासिलेले मूळ संदर्भ, त्यांची चिकित्सा, विश्लेषण आणि त्यावरील भाष्य यांचाही समावेश आहे.
  या व्यतिरिक्त, ऐतिहासिक आधार नसलेल्या परंतु प्रचलित हकीकती व आख्यायिका यांचेही परिक्षण त्यांनी केले असून त्यातील सत्यासत्यतेचीही छाननी केलेली आहे.
  शिवाय, या ग्रंथात आवश्यक तेवढे नकाशे आणि छायाचित्रेही दिलेली आहेत. त्यावरून तत्कालीन परिस्थितीची कल्पना येऊ शकेल.
पुण्याच्या इतिहासाची समग्र व सुसंगत माहिती देणारा एकही ग्रंथ आजवर प्रकाशित झालेला नाही.
  ही अभ्यासकांना वाटणारी खंत, या ग्रंथाद्वारे पूर्ण होईल आणि त्यांना पुण्याच्या इतिहासाची सखोल माहिती एकाच ग्रंथात मिळेल अशी खात्री वाटते.
तसेच, ज्या वाचकांना, पुण्याविषयी, पुण्याच्या विकासाविषयीची, माहिती विस्ताराने हवी आहे त्यांनाही या ग्रंथाचा निश्चितच उपयोग होईल