Pustakanchya Chitravata by Shirish Ghate पुस्तकांच्या चित्रवाटा शिरीष घाटे
'चित्रभाषेच्या विविध शैलींमधून सहज प्रवास, चित्रकलेतील वेगवेगळ्या माध्यमावर प्रभुत्व' आणि साहित्यावर अतोनात प्रेम- हा त्रिवेणी संगम आपल्याला शिरीष घाटे याच्या मुखपृष्ठांमध्ये दिसतो. असे ते म्हणतात. "मुखपृष्ठ म्हणजे साहित्यकृतीकडे नेणारी चित्रवाट साहित्यकृतीचा स्वतःला गवसलेला आशय आत्मसात करत, त्याला दृश्य रूप देण्यास ते तयार होतात. रेषा आकार घेते, डोळ्यासमोर नाचू लागते, अक्षर बनते, रंग मूड तयार करतात, अर्थपूर्ण बनतात साहित्यकृतीशी प्रामाणिक राहण्याची निष्ठा त्याच्या चित्रकारी दृष्टीचे वैशिष्ट्य म्हणता येईल. सर्जनशील कलाकाराच्या अहंकारी भूमिकेत न अडकता, पण त्याचवेळी आत्मविश्वासाने आणि एक दृश्यानुभव जन्माला येतो. या प्रक्रियेबद्दल घाटे यांनी स्वतः लिहिलेली टिपणे उद्बोधक आहेत. ही मुखपृष्ठे साहित्यकृतीकडे नेणारी चित्रवाट असली तरी ही जवळजवळ शंभर निवडक मुखपृष्ठे हा एका विचारी आणि संवेदनशील कलाकाराच्या कामाचा दस्तावेज आहे.त्या वाटेवरचा हा एक स्वतंत्र आनंदही आहे. शिरीष घाटे याने आजवर केलेल्या कलाकृतींपैकी मराठीतील या सुंदर ग्रंथाचे अभिनंदन आणि त्याला मनापासून शुभेच्छा