Pudhacha Paul By Vyankatesh Madgulkar
Regular price
Rs. 108.00
Regular price
Rs. 120.00
Sale price
Rs. 108.00
Unit price
per
देवडीच्या देवी महाराच्या पोरानं तराळकीचं काम करायला नकार देऊन; जातीव्यवस्थेनं लादलेलं ‘जू’ झुगारून दिलं...अन् आपल्या स्वप्नांच्या शोधात त्यानं ‘मुंबई’ गाठली.... पोरानं जातीला बट्टा लावला म्हणून, देवा महारानं हाय खाल्ली...तर, आपला बाप, आपली बायका-मुलं, धाकटा भाऊ यांच्या मायेचे पाश तोडून, कृष्णा त्या स्वप्ननगरीत दाखल झाला.... त्या ‘मायावी नगरी’त त्याला आपली वाट सापडली का?... आपलं स्वप्न तो साकारू शकला का?... या सर्वांचा भावोत्कट मागोवा म्हणजेच ‘पुढचं पाऊल!’