Skip to product information
1 of 2

Payal Books

psychology-of-money-naval-ravikant पैशाचे मानसशास्त्र आणि संपत्तीचे व आनंदाचे रहस्य

Regular price Rs. 450.00
Regular price Rs. 500.00 Sale price Rs. 450.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

विशेष सवलत: संच कोणत्याही कुरियर चार्जेस शिवाय घरपोच. 

पैशाचे मानसशास्त्र - मॉर्गन हाऊजेल

Psychology of Money या Morgan Housel लिखित  प्रसिद्ध इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद - पैशाचे मानसशास्त्र. 

पैश्याचा योग्य वापर हा तुम्हाला असलेल्या माहितीशी फारसा संबंधित नसतो. तो तुम्ही कसे वागता याच्याशी जास्त संबंधित असतो आणि कसे वागावे हे शिकवणे अत्यंत अवघड असते. विशेषतः हुशार लोकांना!

पैशाचे नियोजन, त्याची गुंतवणूक, आणि धंद्यातील निर्णय या गोष्टींमध्ये गणित आणि आकडेमोड आवश्यक असते असे सर्वसाधारणपणे मानले जाते, यात अनेक सूत्रे आणि माहिती वापरली जाते आणि मग काय निर्णय घ्यायचा हे ठरवले जाते. यात अनेक सूत्रे आणि माहिती वापरली जाते आणि मग काय निर्णय घ्यायचा हे ठरवले जाते. पण व्यवहारात लोक स्प्रेडशीटवर निर्णय घेत नाहीत. ते जेवताना, बैठक चालू असताना निर्णय घेतात... जेथे तुमचा भूतकाळ, तुमचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, तुमचा अहंकार, अभिमान, खरेदी-विक्री अशा अनेक बाबी त्या निर्णयात अप्रत्यक्षपणे भाग घेत असतात.

पैशाचे मानसशास्त्र या पुस्तकात लोकं पैशाबद्दल किती अनोख्या पद्धतीने विचार करतात या विषयी लेखक १९ गोष्टी सांगत आहेत, शिवाय आयुष्यातील महत्वाच्या विषयांपैकी एक अशा 'पैसा' या विषयावर महत्वाचे धडे देत आहेत. 

-------------------------------------------------------------

संपत्तीचे व आनंदाचे रहस्य 

श्रीमंत होणे हा काही फक्त नशिबाचा भाग नाही,
तसेच आनंदी असणे हे काही जन्मजात
स्वभाववैशिष्ट्य म्हणता येणार नाही.


या गोष्टींची आकाक्षा करणे हे कल्पनेपलीकडले वाटू शकते, पण खरे तर सपत्ती मिळवणे आणि आनंदी राहणे ही कौशल्ये आहेत. जी आपण थोड्या प्रयत्नाने प्राप्त करू शकतो. काय आहेत ही कौशल्ये आणि आपण ती कशी मिळवू शकतो? त्यासाठीचे प्रयत्न करताना कुठली तत्त्वे पाळायला हवीत? आपला होणारा विकास किंवा आपल्यातील बदल दिसतो कसा? हे या पुस्तकातून उलगडते. नवल रविकांत हे उद्योजक, तत्त्वज्ञ आणि गुंतवणूकदार आहेत. संपत्ती आणि टिकून राहणारा आनंद मिळवण्याच्या त्यांच्या युक्त्यांनी जगाला मोहित केले आहे. गेल्या दहा वर्षांत त्यांनी मिळवलेला अनुभव आणि शहाणपण हे त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि थेट मुलाखतीतून त्यांनी मांडले आहे. त्याचा गोषवारा संपत्तीचे व आनंदाचे रहस्य' या पुस्तकामध्ये आहे. अमुक गोष्टीसाठी नेमके काय करावे किंवा कशा पायऱ्या पार कराव्यात असे काहीच हे पुस्तक सांगत नाही.तर नवल यांच्या स्वतःच्या शब्दातून, आनंदी आणि संपन्न आयुष्याकडे कशी वाटचाल करावी हे तुम्हीच शिकता.