PSYCHOLOGY OF MONEY पैशाचे मानसशास्त्र BY- मॉर्गन हाऊजेल
Psychology of Money या Morgan Housel लिखित प्रसिद्ध इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद - पैशाचे मानसशास्त्र.
पैश्याचा योग्य वापर हा तुम्हाला असलेल्या माहितीशी फारसा संबंधित नसतो. तो तुम्ही कसे वागता याच्याशी जास्त संबंधित असतो आणि कसे वागावे हे शिकवणे अत्यंत अवघड असते. विशेषतः हुशार लोकांना!
पैशाचे नियोजन, त्याची गुंतवणूक, आणि धंद्यातील निर्णय या गोष्टींमध्ये गणित आणि आकडेमोड आवश्यक असते असे सर्वसाधारणपणे मानले जाते, यात अनेक सूत्रे आणि माहिती वापरली जाते आणि मग काय निर्णय घ्यायचा हे ठरवले जाते. यात अनेक सूत्रे आणि माहिती वापरली जाते आणि मग काय निर्णय घ्यायचा हे ठरवले जाते. पण व्यवहारात लोक स्प्रेडशीटवर निर्णय घेत नाहीत. ते जेवताना, बैठक चालू असताना निर्णय घेतात... जेथे तुमचा भूतकाळ, तुमचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, तुमचा अहंकार, अभिमान, खरेदी-विक्री अशा अनेक बाबी त्या निर्णयात अप्रत्यक्षपणे भाग घेत असतात.
पैशाचे मानसशास्त्र या पुस्तकात लोकं पैशाबद्दल किती अनोख्या पद्धतीने विचार करतात या विषयी लेखक १९ गोष्टी सांगत आहेत, शिवाय आयुष्यातील महत्वाच्या विषयांपैकी एक अशा 'पैसा' या विषयावर महत्वाचे धडे देत आहेत.