Majhya Dhadpadicha Karyanama By Anand Karandikar
Regular price
Rs. 395.00
Regular price
Sale price
Rs. 395.00
Unit price
per
माझ्या धडपडींचा कार्यनामा ‘आयआयटी’ आणि ‘आयआयएम’ सारख्या प्रतिष्ठित शिक्षण संस्थांमधून साठ – सत्तरच्या दशकांत विद्यार्थी म्हणून घडताना, एक तरूण भवतालच्या समाजाकडेही संवेदनशीलतेने बघत होता…. तर करियर घडवताना, लठ्ठ पगाराच्या विळख्यात अडकून नोकरी एके नोकरी न करता विविध क्षेत्रांत कल्पक संकल्पनांचा अवलंब करत होता… अनेक प्रयोग करत खऱ्या अर्थाने कार्यरत होता. मॅनेजमेन्ट क्षेत्रातील गुरू आणि सामाजिक चळवळीतील पूर्णवेळ कार्यकर्ता अशा दोन ध्रुवांवरच्या भूमिका निभावत विधायक काम करू पाहणारा हा धडपड्या म्हणजे आनंद करंदीकर..
‘इंडसर्च’ या प्रसिद्ध मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या स्थापनेमध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे . ‘मेट्रिक कन्सल्टन्सी लि.’ ही भारतातील अव्वल दर्जाची मार्केट रिसर्च आणि कन्सल्टन्सी फर्म त्यांनी दूरदृष्टी ठेवून उभारली. या कंपनीच्या माध्यमातून शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागातील युवकांमधील कौशल्य विकसित करून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. सामाजिक कामाच्या आघाडीवर ‘युक्रांद’ , ‘जनवादी महिला संघटना’ , ‘लोकविज्ञान संघटना’ अशा संघटनांसोबत अनेक संघर्षात्मक आणि विधायक कामं त्यांनी केली. या पुस्तकात त्यांनी आपल्या अशाच अनेक धडपडींना स्वतःच्या खास शैलीत शब्दबद्ध केलं आहे. हे सर्व कार्यानुभव वाचतांना जाणवते ती त्यांची काम करण्याची तळमळ, कामाकडे बघण्याचा व्यावसायिक दृष्टिकोन, कमालीची कल्पकता आणि अचंबित करणारा उत्साह !
एका प्रसिद्ध कवीचा मुलगा ही ओळख मागे टाकत दोन टोकांवरच्या प्रवासातील उड्या घेत केलेल्या आनंदी धडपडीचा हा प्रामाणिक लेखाजोखा … अर्थात माझ्या धडपडीचा कार्यनामा !