Payal Books
Toch Mi By Prabhakar Panshikar
Couldn't load pickup availability
'‘माझं आयुष्य मी मनापासून जगलोय, कृतार्थपणे जगलोय. अपवादानं कुणाला तरी क्लेश देत, पण बहुतांश आनंदानं जगलोय. माझ्या मुठीत मावतील एवढया आनंदाच्या दाण्यांचं वाटप मी कायम करीत आलोय.... आणि तरीही माझी मूठ भरलेलीच राह्यलीय, हे माझं अहोभाग्य! माझ्या ओंजळीत जे पडलं, ते मी सुहास्य वदनानं स्वीकारलं. आणि ते बघण्यात मी इतका रमलो, की इतरांच्या ओंजळीत काय, पडलं, हे बघायची मला कधी फुरसतच मिळाली नाही. ईश्वराकडे मागणं एकच, तू केवळ माझ्यासाठीच रचलेलं हे जीवनगान मी जर मनापासून आळवलं असेल, तर मला तू पुन्हा जीवनाकडे पाठव, पुन्हा पुन्हा पाठव आणि मला पुन्हा नटाचाच जन्म दे आणि तोही याच मराठी भूमीत दे!’
