Payal Books
Sangharshayatri By Uttam Khobragade
Couldn't load pickup availability
'‘आपल्या समाजबांधवांच्या उत्कर्षाला साहाय्यभूत व्हा.’ हा होता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश. बाबासाहेबांच्या विचारांच्या मुशीत घडलेल्या एका तरुणाने हा संदेश आपले जीवनध्येय बनवला. त्याला जाणवले - गरिबांना, शोषितांना अन् वंचितांना न्याय देण्यासाठी गरज असते कायद्याच्या कर्तव्यकठोर कारवाईची. अशा कारवाईची जागरूकपणे अंमलबजावणी करण्यासाठी उन्मत्त धनदांडगे, मुजोर राजकारणी, जातीयवादी अधिकारी यांच्या अत्याचारांच्या विरोधात तो ठामपणे उभा ठाकला ! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मिलेल्या घटनेच्या चौकटीचाच भक्कम आधार घेत न्याय्य तत्त्वासाठी लढा देणाऱ्या आणि आपल्या हाती सोपवलेल्या प्रत्येक विभागावर कुशल व्यवस्थापनाचा ठसा उमटवणाऱ्या निग्रही अन् कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या कारकिर्दीचा पट मांडणारे – संघर्षयात्री '
