Payal Books
Arpanpatrikatun Ga Darshan By V G Wader
Couldn't load pickup availability
'जी. ए. कुलकर्णी म्हणजे एक अरभाट साहित्यिक! अवघ्या सत्त्याण्णव कथांमधून जीवनाचा भला मोठा पैस कवेत घेणारे कथाकार. जितके प्रतिभेच्या तेजाने तळपणारे, तितकेच गूढतेचे धूसर वलय बाळगणारे. ना कोणात मिसळणारे, ना कुणाला भेटणारे. ना सभासमारंभात मिरवणारे, ना कुणाला सामोरे जाणारे. कसा शोध घ्यायचा या लेखकाच्या मनातल्या अंत:प्रवाहाचा? वाचकाला थक्क करणारी त्यांच्या कथासृष्टीतली पात्रे, परिसर, कथानक आले तरी कोठून? जी. एं. च्या वैशिष्टयपूर्ण अर्पणपत्रिकांनी वि. गो. वडेर यांना साद घातली. आणि त्यातून ते शोधत गेले - जी. एं. च्या आयुष्यातील व्यक्ती आणि कथांतील पात्रे. या प्रयासातून उभे राहिलेले हे पुस्तक!
