Skip to product information
1 of 2

Payal Book

Prerana (प्रेरणा) by Shivajirao Bhosale

Regular price Rs. 314.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 314.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
pulication
वडिलधार्‍यांची लहानांविषयी एक कायमची तक्रार असते. आजकाल मुले काही करीत नाहीत. नुसती धावतात, धडपडतात, अडखळतात, ठेचाळतात, हसतात, खिदळतात आणि उधळतात. त्यांच्या येण्याजाण्याला, धावण्यापळण्याला, उठण्याबसण्याला अर्थ नाही. आपली मुले म्हणजे आपल्यापुढे नियतीने धरलेले आरसे असतात. त्यात दिसते ते आपलेच रुप असते. मुलांच्या डोळ्यापुढे विविध क्षेत्रातील पराक्रमांची शिखरे दिसली तर त्यांना त्या दिशेने धाव घेण्याची बुद्धी होईल. "प्रेरणा" हे अशा शिखराचे दर्शन आहे. ही शिखरे दिसली तर ती मुलांना खुणावतील, साद घालतील. मग मुले मनाशी म्हणतील ’आपण त्या दिशेने का न जावे?’ मुलांनी हे म्हणावे आणि त्या दिशेने धावत राहावे हीच माझ्यासारख्या शिक्षकाची इच्छा ! या इच्छेतून साकारलेली एक लेखमाला आता पुस्तक रुपात प्रकट होत आहे.