Premkatha By Annie Zaidi Translated By Mugdha Shukre
Regular price
Rs. 288.00
Regular price
Rs. 320.00
Sale price
Rs. 288.00
Unit price
per
"लवकरच हे सगळं संपेल. हे सगळं इतक्या लवकर होईल, असा विचार तिने कधीच केला नव्हता. हा नाही-तरी दुसरा नेहमी तिच्या मनात यायचा. रात्री तो उशिरा घरी आला. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू– खोटं-खोटं हसणं. वास्तवात ते नाहीच आहे. असं झालं तर काय होईल? किंवा त्याच्या मीटिंग्ज खूप उशिरापर्यंत लांबू लागल्या आहेत किंवा तिला टाळण्यासाठी तो बाल्कनीत जाऊन फोनवर बोलू लागला आहे. किंवा तिने शहराबाहेरच्या टेकडीवर एक काचेच्या भिंती असलेलं घर बांधलं आणि तिथल्या बेडरूमला लावायच्या पडद्यांचा पोत कसा असेल याबद्दल ती अखंड बोलत असताना तो तिच्यावर खेकसला आणि त्याने त्या घराचा चक्काचूर केला, तर? तर, ती काय करेल? लांबच्या लांब दुपारी ती एकटी पडलेली असायची तेव्हा, जेव्हा ती बेडशीट्स बदलायची कव्हर्स घड्या घालून ठेवायची तेव्हा, किंवा टीव्हीवरची धूळ झटकायची, लायब्ररीतून डीव्हीडी येऊन यायची तेव्हा... तिने या सगळ्या शक्यतांचा विचार केला होता. पण अशा रेंगाळत राहणाऱ्या, सत्यानाश करू शकणाऱ्या पर्यायाचा तिने कधीच विचार केला नव्हता. "