Skip to product information
1 of 2

Payal Books

Pratiroop By Priya Kumar Translated By Swati Kale

Regular price Rs. 176.00
Regular price Rs. 195.00 Sale price Rs. 176.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
‘प्रतिरूप’ हे पुस्तक म्हणजे पारंपरिक पद्धतीचे "SELF HELP" पुस्तक नाही. हे पुस्तक म्हणजे असंख्य मानसिक, आध्यात्मिक अडथळ्यांवर मात करीत मिळवलेल्या विजयाची गोष्ट आहे. नेदरलँडला लेखिका स्वशोधाकरिता एकटी जाते. तेथे शमन्स जमातीच्या विधींमध्ये सहभागी होते आणि तेथून तिचा अंतर्मनातील प्रवास सुरू होतो. तिच्या प्रवासात आपण प्रवासी म्हणून कधी सामील होतो, हे कळतच नाही. या पुस्तकात प्रत्येक विधीचे एक प्रकरण आहे. सर्वच विधी अंतर्मुख करायला लावतात. प्रत्येक विधीतून ईश्वरीय सत्य उलगडत जाते. जीवन अनेक शक्यतांचे बनले आहे. सर्वच शक्यतांचा प्रवास आपण करू शकत नाही; पण या पुस्तकाद्वारे सर्व शक्यतांचे ज्ञान मात्र होऊ शकते. जर आपले अंतर्मन योग्य दिशेने नेले, तर बाह्य जगात कोणतीच गोष्ट चुकीची नाही. लेखिका महिनाभर नेदरलँडच्या रहिवाशांबरोबर तसेच चौथ्या पिढीतील शमन्सबरोबर होती. शमन्स ही प्राचीन जमात आहे, जी आध्यात्मिक उत्क्रांती आणि मुक्तीसाठी काही आध्यात्मिक क्रिया करते. भौतिक आणि आध्यात्मिक जगातील दुवा म्हणून शमन्सकडे पाहिले जाते. ‘शमनीझम’ हा आध्यात्मिक ज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव आहे. असे म्हणतात की, शमन्स आत्म्यावर उपचार करतात. उपचार करून तुमच्यातून नष्ट झालेली ऊर्जा ते परत मिळवून देतात. लेखिकेच्या वैयक्तिक पातळीवरील प्रवासात आपण पुस्तकरूपाने सहभागी होतो; पण आपल्या लगेच लक्षात येते की, हा फक्त लेखिकेचा वैयक्तिक प्रवास नाही; लेखिकेच्या प्रवासात आपण सर्वच सहभागी आहोत. ‘मी म्हणजे दुसरे तुम्हीच!’ हे पुस्तकाचे नाव या दृष्टीने सार्थ ठरते. या पुस्तकातून अनेक सनातन मूल्यांचा शोध लागतो. आपल्या नियतीला आपणच आकार देऊ शकतो. गुरू आपल्यातच असतो. निराश होणे अथवा आनंदी राहणे हे पर्याय आहेत. कोणता पर्याय निवडायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. याचक आणि गुरू यामध्ये फरक नसतो. फरक दृष्टिकोन आणि प्रवृत्तीचा असतो. आपणच गुरू असतो आणि शिष्यही! आयुष्य आपणास दोन्ही बाजूंनी शिकवते. अशी अनेक सनातन मूल्ये आपणास जागोजागी भेटतात. अनेक लहानसहान रोचक प्रसंग लेखिकेने शब्दरूपाने फुलवले आहेत. प्रत्येक प्रकरण वाचकाला नवीन अनुभव देऊन जाते. प्रत्येक वेळी नवीनच सत्य समोर येते. मानवधर्म हा वैश्विक आहे. प्रत्येक मनुष्य सारखाच आहे आणि वैयक्तिक पातळीवर त्याचा झगडाही सारखाच आहे. या सर्व झगड्यांतून जात असताना हाती येणारे वैश्विक सत्य चिरंतन असते आणि हाच धागा पकडून लेखिकेने आपल्या समर्थ शैलीने फार नाजूकपणे विणला आहे.