Payal Books
Pratibhavant Shilpkar प्रतिभावंत शिल्पकार by Dipak Ghare दीपक घारे
Couldn't load pickup availability
Pratibhavant Shilpkar प्रतिभावंत शिल्पकार by Dipak Ghare दीपक घारे
जागतिक पातळीवर झालेली शिल्पकलेची जडण-घडण त्यामागची शिल्पकारांची प्रतिभा याबद्दलची अभिरुची निर्माण व्हावी या उद्देशाने काही प्रतिभावंत शिल्पकारांबद्दल या पुस्तकात लिहिलेल आहे. प्रादेशिकतेच्या मर्यादा ओलांडून खरी शिल्पकला आपल्या अंगभूत सामर्थ्यामुळे सार्वकालिक झाली आहे. जागतिक शिल्पकलेमधली ही संदर्भबहुलता आणि त्यामागची कलामूल्य अधिक स्पष्ट व्हावीत या दृष्टीने केलेला हा एक प्रयत्न आहे. या पुस्तकाची व्याप्ती ही मुख्यतः रेनेसान्सकाळापासून सुरू होणाऱ्या आणि उत्तर आधुनिक काळात शिल्पकलेची गृहीतक बदलली गेली तोपर्यंतच्या काळापर्यंत मर्यादित आहे. आधुनिक शिल्पकलेचा हा इतिहास नाही. काही प्रमुख टप्प्यांवर निर्णायक कलाकृती घडवणाऱ्या निवडक शिल्पकार प्रतिभावताचा हा आस्वादक परिचय आहे. त्यात पाश्चात्त्य आणि भारतीय शिल्पकारांचा समावेश आहे. कलामूल्य मग ती भारतीय असोत वा पाश्चात्त्य ती काळानुसार बदलतात आणि पुनरावर्तित देखील होतात. मात्र या पुनरावर्तनामध्ये जुन्या मूल्यांची नव्या संदर्भामध्ये पुनर्रचना असते. ग्रीक सौंदर्यतत्त्वांचा रेनेसान्सकाळातला पुनर्विचार, मीरा मुखर्जीची भारतीय कारागिरीच्या परंपरेची आधुनिकतेच्या जाणिवेतून केलेली पुनर्माडणी, म्हात्रेच्या शिल्पांमध्ये दिसणारा भारतीय आणि पाश्चात्त्य कलाविचारांचा संगम ही या संदर्भातली काही उदाहरण सांगता येतील.
शिल्पकलेच्या एका वेगळ्या विश्वात नेणारं हे पुस्तक वाचकांना नक्कीच आवडेल.
