भास्कर लक्ष्मण भोळे हे आपल्या स्पष्ट, निर्भीड, भक्कम तार्किक पायावर उभ्या असलेल्या, गहन बौद्धिक ताकदीच्या लेखनासाठी ख्यातनाम होते. मुळात राज्यशास्त्र व लोकप्रशासन या विषयाचे व्यासंगी प्राध्यापक असलेल्या भोळे यांच्या आवडीच्या विषयात सामाजिक शास्त्रे, राजकारण, इतिहास, संस्कृती, ललित साहित्य, भाषाविज्ञान इत्यादींचा समावेश होता. साहित्याची सामाजिक-राजकीय दृष्टिकोनातून सखोल समीक्षा करणारे ते मराठीतले एक महत्त्वाचे समकालीन विचारवंत ठरतात. त्यांच्यामध्ये सूक्ष्म बौद्धिक विश्लेषणाची आणि अंतःप्रज्ञेतून आलेल्या संश्लेषणाची विलक्षण प्रतिभा होती, ही गोष्ट ‘प्रास्ताविके’मधील त्यांच्या वेगवेगळ्या प्रस्तावनांमधून अनुभवास येते. या प्रस्तावनांच्या विषयांवरून भोळे यांच्या आस्थेचा परीघ लक्षात येऊ शकतो. या विषयात एकोणिसाव्या व विसाव्या शतकातील मराठी गद्याचा विकास, समग्र राजवाडे साहित्य खंड, जमातवाद, संघपरिवार, निवडणुका, लेवा गणबोली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इन्तजार हुसेन यांच्या कथा, तंट्या भिल्लाच्या शोधाचा मागोवा, ना.धों. महानोरांना आलेली निवडक पत्रे इत्यादींचा समावेश होतो.
भोळे यांनी अगदी महाविद्यालयीन जीवनापासूनच परिवर्तनवादाशी, डाव्या विचारसरणीशी व चळवळींशी, दलितशोषित-श्रमिकांच्या लढ्यांशी बांधिलकी मानली होती. याच बांधिलकीतून ते सामाजिक गतिकीकडे बघत.
भोळे यांचे हे लेखन केवळ परिचयपर नाही. एका निश्चित वैचारिक भूमिकेमुळे हे लेखन वाचकांना विचार करण्यास उद्युक्त करील आणि आपला दृष्टिकोन निकोप करून घेण्यास साहाय्यभूत ठरेल, असा विश्वास वाटतो.
Payal Books
Prastavike | प्रास्ताविके by AUTHOR :- B. L. Bhole
Regular price
Rs. 268.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 268.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
