{"product_id":"prashnopnishad-by-suresh-dwadashiwar-प्रश्नोपनिषद-सुरेश-द्वादशीवार","title":"Prashnopnishad By Suresh Dwadashiwar  प्रश्नोपनिषद । सुरेश द्वादशीवार","description":"\u003cp\u003ePrashnopnishad By Suresh Dwadashiwar  प्रश्नोपनिषद । सुरेश द्वादशीवार\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eइतिहास हा युद्ध आणि शांतता यांच्या पाठशिवणीचा खेळ आहे. त्यातल्या \u003c\/span\u003e\u003cspan\u003eकाही काळात या परस्परविरोधी बाबी समांतर चालत आलेल्याही दिसतात. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eयुद्धे केवळ रणभूमीवरच होत नाहीत. ती मनभूमीवरही होतात. समाज, देश \u003c\/span\u003e\u003cspan\u003eआणि जग यात सुसंगतीएवढीच विसंगतीही आपण पाहत असतो. राजकारणात \u003c\/span\u003e\u003cspan\u003eही गोष्ट वारंवार घडते व तशी ती पाहताही येते. मात्र ज्ञानविज्ञानाच्या, धर्म व \u003c\/span\u003e\u003cspan\u003eसमाजाच्या आणि समूह व व्यक्तीच्या जीवनात त्या कधी तरी दिसत असल्या \u003c\/span\u003e\u003cspan\u003eतरी प्रत्यक्षात कधी त्या ज्वाळेसारख्या, तर कधी नंदादीपासारख्या जळतच \u003c\/span\u003e\u003cspan\u003eअसतात. तीत दु:ख असते. अपमान आणि असाहाय्यताही असते. मात्र तरीही \u003c\/span\u003e\u003cspan\u003eजीवनाविषयीची आसक्ती कायम राहत असेल तर त्यात चांगल्या गोष्टी या \u003c\/span\u003e\u003cspan\u003eअनिष्टांवर मात करीत असणार याच निष्कर्षावर यावे लागते.\u003c\/span\u003e\u003cspan\u003eप्रश्न खूप आहेत आणि त्यांची उत्तरेही फार आहेत. त्यातली काही पटतात, तर \u003c\/span\u003e\u003cspan\u003eकाही पटत नाहीत. तरीही आपण जगतो. हे जगणे उत्तरांच्या शोधांसाठी प्रश्नांसोबत \u003c\/span\u003e\u003cspan\u003eकेलेली वाटचालच असते. प्रश्नांना शेवट नाही आणि उत्तरे नेहमी दूरच दिसतात. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eही स्थिती प्रश्नांशी जुळवून घ्यायलाच सांगणारी आहे. जिला सार्थकता म्हणतात \u003c\/span\u003e\u003cspan\u003eती याहून वेगळी नसते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"PAYAL BOOKS","offers":[{"title":"Default Title","offer_id":50066875187393,"sku":null,"price":220.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Prashnopnishad_By_Suresh_Dwadashiwar.jpg?v=1774164975","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/prashnopnishad-by-suresh-dwadashiwar-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a5%8b%e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a4%a6-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b6-%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%b6%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}