PAYAL BOOKS
Prashnopnishad By Suresh Dwadashiwar प्रश्नोपनिषद । सुरेश द्वादशीवार
Couldn't load pickup availability
Prashnopnishad By Suresh Dwadashiwar प्रश्नोपनिषद । सुरेश द्वादशीवार
इतिहास हा युद्ध आणि शांतता यांच्या पाठशिवणीचा खेळ आहे. त्यातल्या काही काळात या परस्परविरोधी बाबी समांतर चालत आलेल्याही दिसतात. युद्धे केवळ रणभूमीवरच होत नाहीत. ती मनभूमीवरही होतात. समाज, देश आणि जग यात सुसंगतीएवढीच विसंगतीही आपण पाहत असतो. राजकारणात ही गोष्ट वारंवार घडते व तशी ती पाहताही येते. मात्र ज्ञानविज्ञानाच्या, धर्म व समाजाच्या आणि समूह व व्यक्तीच्या जीवनात त्या कधी तरी दिसत असल्या तरी प्रत्यक्षात कधी त्या ज्वाळेसारख्या, तर कधी नंदादीपासारख्या जळतच असतात. तीत दु:ख असते. अपमान आणि असाहाय्यताही असते. मात्र तरीही जीवनाविषयीची आसक्ती कायम राहत असेल तर त्यात चांगल्या गोष्टी या अनिष्टांवर मात करीत असणार याच निष्कर्षावर यावे लागते.प्रश्न खूप आहेत आणि त्यांची उत्तरेही फार आहेत. त्यातली काही पटतात, तर काही पटत नाहीत. तरीही आपण जगतो. हे जगणे उत्तरांच्या शोधांसाठी प्रश्नांसोबत केलेली वाटचालच असते. प्रश्नांना शेवट नाही आणि उत्तरे नेहमी दूरच दिसतात. ही स्थिती प्रश्नांशी जुळवून घ्यायलाच सांगणारी आहे. जिला सार्थकता म्हणतात ती याहून वेगळी नसते.

