Skip to product information
1 of 2

PAYAL BOOKS

PRASHNA PRADESHAPALIKADE by DINKAR JOSHI

Regular price Rs. 324.00
Regular price Rs. 360.00 Sale price Rs. 324.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
publications

PRASHNA PRADESHAPALIKADE by DINKAR JOSHI

राजपुत्र सिद्धार्थ राजमहालात वाढतो. दु:खापासून त्याला राजा शुद्धोदन कोसो दूर ठेवतात; पण अखेर ऋषींची भविष्यवाणी खरी ठरते. राणी यशोधरेशी त्याचा विवाह होतो. पुत्र राहुलचा जन्म होतो आणि हा राजकुमार एका रात्रीत सर्वस्वाचा त्याग करून परमसत्याचा मार्ग शोधत महालाबाहेर पडतो. दीर्घकाळ भ्रमण-पदयात्रा, गुरूंचा शोध, कठोर तपस्या व वनांतील सहवास स्वीकारतो. ज्ञानप्राप्तीनंतर वाटेत भेटलेल्यास जनांस उपदेश, मानवी जीवनाचा उद्धार, तृष्णात्याग व परमसत्याच्या मार्गाचे ज्ञान गौतम बुद्ध बनून देतात. राजा शुद्धोदनास वृद्धापकाळी अपार दु:ख झाले. कारण बुद्धांनी आपला पुत्र राहुल, धाकटा भाऊ नंद यांसही दीक्षा दिली. चुलत बंधू आनंद, अनिरुद्ध हेसुद्धा दीक्षा घेऊन भिक्खू बनले. कपिलनगरी युद्धात नाश पावली. बुद्धांना दीर्घायुष्य मिळाले; पण आप्तांचे मृत्यू पाहावे लागले. तरीही ध्येयापासून जराही विचलित न होता त्यांनी जगाला ज्ञानमुक्तीचा मार्ग सांगितला. त्यांच्या निर्वाणानंतर त्यांचा देह सात दिवस कुशीनाराच्या चितेवरच होता. दावेदार भांडत होते. अखेर महाकाश्यपांनी त्यांना वंदन करून अग्नि दिला व त्यांच्या देहाची राख व अस्थींचे समान वितरण करून आपापल्या देशात स्तूपनिर्मितीसाठी दावेदारांना दिले