{"product_id":"prasangopat-part-2-प्रसंगोपात-भाग-२-by-sharad-navare","title":"Prasangopat : Part-2 प्रसंगोपात भाग-२ By Sharad Navare","description":"\u003cp\u003eप्रसंगोपात भाग-२\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत पुस्तक एकाचवेळी अनेक महत्त्वाच्या बौध्दिक सिद्धांतनांची सखोल, जिवंत चर्चा आपल्यासमोर आणतं आणि त्याचवेळी प्रासंगिक नव्या-जुन्या महत्त्वाच्या ग्रंथांच्या आणि काही घटितांच्या निमित्ताने आपलं चिंतनही पुढे मांडतं.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमानवी जीवनाचे गतीशास्त्र आणि अशा अनिश्चिततेतही एकत्र येऊन सामुदायिक जीवनाला आकार देण्याची मानवाची धडपड ह्या दोन संदर्भबिंदूंच्या मधल्या सगळ्या मानवी व्यवहाराचं विश्लेषण या ग्रंथात अत्यंत विचक्षणपणे मांडले आहे. आजचे जग समजून घेण्यात अडचणी येऊ नयेत असं वाटत असेल तर मार्क्सच्या द्वंद्वात्मकतेचा साकल्याने विचार होणं, त्या विचारांची पध्दत समजून घेण कसं गरजेचं आहे ते कोसांबी, ओलमन ह्यांच्या लेखनाच्या विश्लेषणातून शरद नावरे सिध्द करतात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eते मार्क्सवाद, नव-मार्क्सवाद अशा सर्वच पोथीनिष्ठ, झापडबंद तात्त्विक चौकटी नाकारत औद्योगिक आणि उत्तर औद्योगिक काळातली परात्मता-ते माणसाची प्रेमाची भूक- ते मार्क्सवादी साहित्य समीक्षा असा चौफेर संचार पूर्णतः समकालीन भारतकेंद्री दृष्टिकोनातून नव्याने करतात. आधुनिकतेच्या युरोपीय मूल्यांमधून जगात मुक्तीचे वातावरण निर्माण होईल अशी भाबडी आशा कशी खोटी ठरली, त्यांची कारणे भांडवलशाहीच्या बदलत्या स्वरूपात कशी होती, हे ते सिद्धांतनांच्या चिकित्सक अभ्यासातून भाष्य करत स्पष्टपणे विशद करतात. तसंच खुलेपणाने मुक्त बाजार आणि उदारमतवादी लोकशाही योग्य मानणाऱ्या पिकेटीसारख्या अभ्यासकाच्या मांडणीची ते सखोल चिकित्सा करतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"PAYAL BOOKS","offers":[{"title":"Default Title","offer_id":50668062965953,"sku":null,"price":445.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Prasangopat_Part-2_-_By_Sharad_Navare.webp?v=1790761418","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/prasangopat-part-2-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-%e0%a5%a8-by-sharad-navare","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}