{"product_id":"prajanan-kahani-jivajanmachi-nisarhachya-navnirmitichi-प्रजनन-कहाणी-जीवनजन्माची-निसर्गाच्या-नवनिर्मितीची-डॉ-प्रकाश-जोशी","title":"prajanan - kahani jivajanmachi  nisarhachya navnirmitichi प्रजनन : कहाणी जीवनजन्माची निसर्गाच्या नवनिर्मितीची - डॉ. प्रकाश जोशी","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eजैवविविधता हाच पृथ्वीतलावरील एक गूढ रंजक विषय आहे. विविध वनस्पती आणि प्राणी यांनी ही सृष्टी संपन्न आहे.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eलाखो जाती-प्रजातींचे प्राणी पृथ्वीतलावर सुखेनैव जगत असतात. \u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eत्यांच्या जीवनशैलीच्या विविधतेस पृथ्वीचं बहुढंगी पर्यावरणही कारणीभूत आहे. \u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eपरिणामत: प्राण्यांच्या प्रजोत्पादन तऱ्हांतही अशीच विविधता आढळते. \u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eपुनरुत्पादन प्रक्रियेस चालना देण्यासाठी लिंगभेदउत्क्रांती विकसित झाली, असा सर्वसाधारण सिद्धांत मांडला जातो. या सिद्धांतालाही काही वैज्ञानिकांचे आक्षेप आहेत. \u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eकारण अविकसित प्राण्यांत असा लिंगभेद नाही, तरीही त्यांचं पुनरुत्पादन कार्य व्यवस्थित चालू आहे. \u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eतसंच काही प्राण्यांमध्ये तर लिंगभेद असूनही अलैंगिक पद्धतीने पुनरुत्पादनाची क्रिया सुरू आहे. \u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eमग प्राण्यांच्या पुनरुत्पादनासाठी लिंगभेद आवश्यक आहे का? असल्यास नर आणि मादी यांचा समागमही आवश्यक असतो का? \u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eपुनरुत्पादनासाठी अंडी, बीजांडं यांची तरी जरुरी आहे का? आणि यांपैकी कोणतीही व्यवस्था प्राण्यांत नसेल, तर ते प्राणी पुनरुत्पादनासाठी \u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eसक्षम असतात का नाही? मग अशा विविध प्राण्यांच्या प्रजननासाठी निसर्गानं काय काय व्यवस्था रचल्या आहेत? \u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eअसे अनेक प्रश्न सामोरे येतात आणि त्यांचा अभ्यास करताना कित्येक रंजक गोष्टी उकलत जातात. \u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eत्याचा वेध घेत निसर्गाच्या थोरवीचं विस्मयकारी दर्शन घडवणारं हे पुस्तक अबालवृद्धांसह सर्वांनी वाचावं असंच आहे. \u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Manovikas Prakashan","offer_id":42768566026433,"sku":"","price":340.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/prajanancover-250x250.jpg?v=1691151587","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/prajanan-kahani-jivajanmachi-nisarhachya-navnirmitichi-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%a8-%e0%a4%95%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%80-%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%a8%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b6-%e0%a4%9c%e0%a5%8b%e0%a4%b6%e0%a5%80","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}