Payal Books
Prachiti Yashachi By: Madhukar Kolate
Couldn't load pickup availability
मनोबल वाढविण्याची प्रक्रिया ही आकाशातून प्राप्त होणारी कुठलीही गोष्ट नाही, तर तिच्यासाठी हेतू पुरस्सर प्रयत्न करावा लागणार आहे. हे प्रयत्न एका निर्धारित रस्त्याने केले तर निर्धनतेतून सधनतेकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे आणि असमाधानातून समाधानाकडे वाटचाल आपोआपच होत राहील. त्यामुळे तुमच्या आवश्यक असलेल्या गरजा, मग त्या पैशांच्या स्वरुपात असोत की, ज्ञानाच्या स्वरुपात असोत वा मानाच्या स्वरुपात असोत, अपुऱ्या राहणार नाहीत. तुमचे व्यक्तिमत्व आपोआप उजळून निघेल आणि विकासाचा खरा अर्थ तुम्हाला जीवनात सापडू शकेल आणि अधोगतीविना प्रगतीचा मार्ग तुम्ही आपोआप चालू शकाल.
मधुकर कोलते
आज जीवन अत्यंत गतिमान झाले आहे. जीवनातील गुंतागुंत वाढली आहे. माणसांच्या मनावरचे ताणतणाव वाढत आहेत. परिणामी असंख्य लोकांच्या चिंताग्रस्ततेतही वाढ होत आहे. या स्थितीत माणसे सुख, समाधान, आनंद आणि मनःशांती यांच्या शोधात आहेत. श्री. कोलते ही। परिस्थिती प्रदिर्घ काळ पहात आले आहेत. म्हणूनच अभ्यास व चिंतन याद्वारे इतरांना मार्गदर्शक ठरावा असा प्रचिती यशाची चा मार्ग त्यांनी सांगितला आहे. सर्वसामान्य माणसापासून उच्चपदस्थ सर्वांना तो उपयुक्त ठरेल, अशी मला आशा आहे.
