Skip to product information
1 of 2

PAYAL BOOKS

Prachin Mandire, Murti Aani Bhavapurna Shilpe By Uday Indurakar प्राचीन मंदिरे, मूर्ती आणि भावपूर्ण शिल्पे

Regular price Rs. 343.00
Regular price Rs. 390.00 Sale price Rs. 343.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

प्राचीन मंदिरे मूर्ती आणि भावपूर्ण शिल्पे

भारतीय मंदिर म्हणजे आपल्या संस्कृतीचे चिरस्थायी असा सुंदर आविष्कार आहे.मंदिराच्या बहिर अंगाची वर्णने केली जातातच,ती पाहून आपण मोहित ही होतो.बह्यांग हे बहुस्वरुप सांगत असेल.तर मंदिराचे अंतरंग हे माणसाच्या अर्थात भक्ताच्या अंतरंगाशी संवाद साधत असते.मंदिरांच्या अंतरंगाचा मंदिर रचनेत प्रतीत होणाऱ्या अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाचा विचार केलेला असतो. मंदिर स्थापत्याचा विकास याच अनुरोधाने होत गेल्याचे दिसते.असा भक्ताच्या भक्ताच्या अंतर आत्म्याशी संवाद साधणारे शिल्प समजून सांगत आहेत उदयन इंदुरकर!

दगडलाही जिवंत करतो तो शिल्पकार आणि जे पाहून पृथ्वीवर जणू स्वर्ग अवतीर्ण होतो,अशी सुंदर शिल्पकला! या शिल्पकलेचा नेमका अर्थ सांगणाऱ्या तज्ञात प्रमुख नाव म्हणजे उदयन इंदुरकर!एक होते देऊळ या त्यांच्या प्रसिद्ध कार्यक्रमातून हजारो रसिकांना शिल्प,मूर्ती आणि मंदिर समजले!दुर्दैवाने उदयन इंदुरकर आपल्यात नाहीत! पण त्यांनी लिहून ठेवलेले अतिशय सुंदर असे एक पुस्तक उपलब्ध आहे.ते म्हणजे...

 

 

'एक होतं देऊळ ' हा कार्यक्रम पाहून प्रेरित होऊन लोक इंडोलॉजी विषयाकडे वळल्याचीही अनेक उदाहरणं आहेत. असा हा कार्यक्रम चित्रित व्हावा अशी माझी खूप इच्छा होती. इंदूरकर आपल्या पुस्तकांमधून बोलले आहेतच, पण त्यांचा अभ्यास डिजिटल माध्यमातूनही साठवणं खूप आवश्यक होतं. " 'एक होतं देऊळ' ध्वनिचित्रमुद्रित व्हायला पाहिजे" असं मी मामाकडे बोलून दाखवलं. मामाकडून कळलं की असा प्रयत्न झालाही होता, पण काही कारणाने तो पूर्णत्वास जाऊ शकला नव्हता. काही काळाने मामाकडे बोलताना मी पुन्हा विषय काढला आणि त्यासाठी छायाचित्रकार उपलब्ध करून द्यायचीही तयारी दाखवली. त्यावेळी मामाकडून कळलं की त्यांना अर्धांगवायू झाला आहे. ते ऐकलं आणि काळजात चर्रर्र झालं. हा अफाट कार्यक्रम आता फक्त उदयन इंदूरकरांच्या स्मृतीत राहणार या भीतीने ग्रासलं. आज त्या भीतीतून कायमची सुटका झाली पण ही सुटका अधिक दुर्दैवी आणि क्लेशदायक आहे. डॉ. उदयन इंदूरकर त्यांच्या पुस्तकांमधून जो वारसा ठेवून गेले आहेत तो जपणे त्याचा अधिकाधिक प्रसार करणे हेच आपल्या हातात आहे.