Skip to product information
1 of 2

PAYAL BOOKS

Prachin Madhyayugin Aani Adhunik Bharatachya Itihasvaril Teen Pustakancha Sanch

Regular price Rs. 1,120.00
Regular price Rs. 1,400.00 Sale price Rs. 1,120.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Prachin Madhyayugin Aani Adhunik Bharatachya Itihasvaril Teen Pustakancha Sanch

प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक 

1. प्राचीन भारताचा इतिहास – आर. एस. शर्मा
पाने:370 । किंमत: ₹400
इंडियाज एन्शन्ट पास्ट हे प्राचीन भारताचा इतिहास सांगणारे सुलभ आणि सर्वसमावेशक पुस्तक आहे. इतिहासाच्या लेखन करण्याच्या रचनेच्या संबंधातील मांडणीतील दृष्टिकोन, स्रोत, आणि त्यांचे महत्त्व यांपासून सुरुवात करून संस्कृती, साम्राज्ये आणि धर्म यांची सुरुवात कशी झाली ? त्यांचा विकास कसा झाला? याची ओळख या पुस्तकात करून दिलेली आहे. तसेच भूगोल, पर्यावरण आणि भाषिक पार्श्वभूमी यांचाही विचार केलेला आहे. त्या संदर्भात नव-पाषाणयुग, ताम्रपाषाणयुग, वेदकाळ, त्याचप्रमाणे हडप्पा संस्कृतीची माहिती समाविष्ट केली आहे. या पुस्तकात लेखक जैन, बौद्ध या धर्मांचा उदय, मगध आणि प्रादेशिक राज्यांचे आरंभ आणि मौर्य, मध्य आशिया खंडातील देश, सातवाहन, गुप्त, आणि हर्षवर्धन यांचे कार्यकाळ या सगळ्यांचा समग्र ऊहापोह करतात.

2. मध्ययुगीन भारताचा इतिहास – सतीश चंद्र
पाने:456 । किंमत: ₹500
सतीश चंद्र लिखित ‘मध्ययुगीन भारताचा इतिहास’ या पुस्तकात आठव्या ते अठराव्या शतकादरम्यानच्या भारतीय उपखंडातील इतिहासाचा सर्वसमावेशक आढावा घेण्यात आला आहे. यात प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश आहे. चोळ, बहामनी आणि विजयनगर या राज्यांचा इतिहास , सूर, लोदी, दिल्ली सल्तनत आणि मोगल यांचा पडलेला प्रभाव , रजपूत राजे आणि मराठ्यांचे महत्त्व , सुफीवाद आणि भक्ती चळवळ यांसारख्या धार्मिक चळवळी
बदलत जाणारे राजकीय, आर्थिक आणि कृषिविषयक चित्र

3. आधुनिक भारताचा इतिहास- बिपन चंद्र
पाने:404 । किंमत: ₹500
ब्रिटिश इंडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक कालखंडाचा विश्वासार्ह आढावा आपल्याला ‘आधुनिक भारताचा इतिहास’ या पुस्तकात वाचायला मिळतो. बहुतांश वेळा आढळून येणारा राजकीय दृष्टिकोन बाजूला ठेवत भिन्न मार्गाने जाणाऱ्या या पुस्तकात खालील बाबी सापडतील. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला सत्ता हस्तगत करण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या अठराव्या शतकातील भारतामधील स्थितीचे विवेचन,वासाहतिक सत्तेच्या मुख्य ध्येयाचे महत्त्वपूर्ण विश्लेषण -व्यापार व गुंतवणुकीतून भारताचे आर्थिक शोषण , स्वातंत्र्यचळवळीचे सखोल वर्णन , प्रमुख स्वातंत्र्यसेनानींची ओळख