Skip to product information
1 of 2

PAYAL BOOKS

Prachin Bharat by Upinder Singh Shital Bhangre प्राचीन भारत

Regular price Rs. 450.00
Regular price Rs. 500.00 Sale price Rs. 450.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Prachin Bharat by Upinder Singh Shital Bhangre प्राचीन भारत

प्राचीन भारत : विरोधाभासांची संस्कृती या पुस्तकातून भारतातल्या एक सुप्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ वाचकांना आपल्या प्राचीन भूतकाळाच्या शोधाचा एक रोमांचक प्रवास घडवतात. उपेंद्र सिंह आपल्याला प्राचीन भारताबद्दलच्या आपल्या साचेबद्ध कल्पना बाजूला ठेवत त्या काळातील पाच प्रभावी विरोधाभासांचे सहअस्तित्व लक्षात घ्यायला लावतात- सामाजिक विषमता आणि सर्वांसाठी मुक्तीचे वचन, वासना आणि विरक्ती या दोन्हींना दिलेले महत्त्व, देवीमाहात्म्य आणि स्त्रीद्वेष, हिंसा आणि अहिंसा आणि शेवटी धार्मिक क्षेत्रातली वादविवादांची परंपरा आणि संघर्ष. या विरोधाभसांच्या मांडणीसाठी त्यांनी अतिशय वैविध्यपूर्ण स्तोत्रांचा वापर केला आहे. त्यात धार्मिक आणि तत्त्वज्ञान विषयावरचे ग्रंथ आहेत; महाकाव्ये, कविता, नाटके, वेगवेगळ्या शास्त्रांवरील वरील ग्रंथ, प्रहसने, चरित्रे, शिलालेख आहेत; तसेच उपखंडात सर्वत्र पसरलेल्या स्थळांवरचे पुरातत्वीय अवशेष आणि कलांचे भौतिक- सौंदर्यशास्त्रीय पुरावे ही आहेत. सिंग यांची शैली अभ्यासकीय असली तरी अत्यंत सोपी आहे. त्यांची स्वच्छ स्पष्टीकरणे आणि संतुलित अन्वयार्थ यातून एका तज्ञ इतिहासकाराचे सखोल आकलन दिसून येते आणि ज्याला आपण प्राचीन भारतीय संस्कृती म्हणतो, त्या संस्कृतीचे अनेक धागे हळूहळू उलगडत जातात. हा आपला लांबवरचा भूतकाळ असला तरी तो मृत झालेला किंवा विस्मृतीत गेलेला नाही. कारण अगदी आजही वेगवेगळ्या संदर्भात त्यांचा उल्लेख केला जातो. शिवाय गेल्या अनेक शतकातल्या प्रचंड ऐतिहासिक बदलांनंतरही या चर्चा केलेले विचार विरोधाभास वर्तमानात तसेच दिसून येतात.