Prachin-Arvachin Sahityanubandha| प्राचीन-अर्वाचीन साहित्यानुबंध Product Code: Prachin-Arvachin Sahityanubandha| प्राचीन-अर्वाचीन
मराठी वाङ्मयातील प्राचीन व अर्वाचीन काळातल्या अंत:प्रवाहांमधल्या अनुबंधाचा शोध येथे आहे. साठोत्तरी मराठी अध्ययनक्षेत्रात ‘देशी’ अनुबंधांच्या शोधाची प्रवृत्ती विशेष दिसते. पूर्वकालीन मराठी लेखकांनाही ह्या अनुबंधाचा विसर पडला नव्हता. बहिणाबाईंपासून शांताबाईंपर्यंतच्या आणि मर्ढेकरांपासून महानोरांपर्यंतच्या काव्यधारेने संतसाहित्य व लोकसाहित्य ह्यांच्याशी आपला अनुबंध मान्य केला. किर्लोस्कर ते तेंडुलकर व पुढे आळेकर, एलकुंचवारांपर्यंतच्या नाट्यधारेने जुन्या वाटेवर नवी पावले उमटविली. प्रायोगिक रंगभूमीने जुन्या लोककलांशी नाते जपले. संत-साहित्य, लोककला, लोकवाङ्मय व प्राचीन भारतीय साहित्यातून वाहत सर्व भारतीय भाषांत पसरलेला भारतीय धारणांचा प्रवाह, हे सर्व आजच्या मराठी साहित्यापर्यंत कसे वाहत आले आहेत ह्याचा साक्षेपी शोध म्हणजे हा ग्रंथ.