Pool |पूल Author: Manisha Dixit |मनीषा दीक्षित
रेवतीची ही कथा तिच्यासारख्या आजच्या अनेकजणींची असू शकते. अर्थपूर्ण सहजीवनाच्या स्वप्नांना जाणारे तडे सोसताना तिची होणारी दमछाक आणि येणारे दुखरे एकटेपण; त्यातून सकारात्मक मार्गच शोधण्याची धडपड आणि त्यासाठीचे बळ कमावण्यासाठी एका विधायक वाटेवरची तिची वाटचाल यांची ही कथा...! कादंबरीत दोन काळांची गुंफण आहे. रेवतीच्या वर्तमानकाळातल्या आयुष्यातले अवघे तीन दिवस आणि त्या तीन दिवसांमध्ये तिच्या मनाने केलेला भूतकाळातल्या २५-३० वर्षांचा प्रवास अशी ही रचना आहे. शेवटी कथा वर्तमानात, एका नव्या ऋतूच्या आरंभापाशी येऊन संपते. ‘रुजवण’ या व्यक्तीचित्रांच्या संग्रहानंतरचे मनीषा दीक्षित यांचे हे दुसरे पुस्तक; आणि पहिलीच कादंबरी.