Pita-Putra By Madhukar Dharmapurikar
जागतिकीकरण आणि प्रसिद्धी माध्यमांचा विस्तार, यांमुळे आज माणसाचे भोवताल बदलून गेले आहे. या बदलाचा सर्वाधिक प्रभाव मानवी नातेसंबंधांवर झालेला आहे.
नातेसंबंधांतली ऊब, आत्मीयता, विश्वास आता विरळ होत चालल्याची जाणीव सतत होत असते. नातेसंबंधांनी बद्ध असणारी माणसं आता विखुरलेली आहेत आणि एखादी गोष्ट जेव्हा दुरावते तेव्हाच ती आपल्याला सर्वाधिक गरजेची वाटू लागते.
पिता-पुत्राचे नाते असेच.
पित्याच्या वृक्षासारख्या छायेत बालपण हे सुरक्षित असतं आणि तरुणपणात जेव्हा आपले म्हणाले असे विश्व निर्माण व्हायला लागतेे तेव्हा सगळ्या नात्यांत अधिक अडथळे येत असतात ते पित्याचे! तथापि, आपण जसजसं स्वतंत्र होत जातो तसतसं लक्षात येतं, की कोणत्या न कोणत्या बिंदूवर आपण सर्वच जण पित्याच्या छायेतच वावरत आहोत.
माणसाच्या जीवनात जेवढ्या प्रकारचे नातेसंबंध आहेत त्यात पित्यासारखं बहुआयामी आणि विविध स्तर असलेलं दुसरं नातं नाही.
अशा नातेसंबंधांचा वेध घेणार्या मराठी व इतर भाषांतील या निवडक अनुवादित कथा!