Payal Books
Phating by g p raibole
Couldn't load pickup availability
वऱ्हाडातल्या ग्रामीण जीवनातील जगण्याचं विक्राळ अठरापगडी रहाटगाडगं पाटिलपुरा आणि फुकटपुरा या दोन नावांच्या दरम्यान उभं राहतं. व्यवहार आणि गावकी या दोन खुंट्यांनी तोललेल्या ग्रामव्यवस्थेच्या चक्रात संवेदनशील, तत्वनिष्ठ, स्वाभिमानी व रांगड्या शिरपा'चा एकाकी उपरेपणाच भेलकांडत राहतो. गो. पु. रायबोले हे त्यांच्या पहिल्याच कादंबरीत शिरपाच्या बरोबरीनं विदर्भातली झळभऱ्या प्रदेशातलं जगणं प्रत्यकारकतेनं उभं करतात. मूळगावातून स्वेच्छेनं परगंदा होऊन 'टिंबरी'ला आपलं सर्वस्व मानणारा, त्यासाठी राबणारा, गावातल्या सगळ्यांच्या गळ्यातला ताईत झालेल्या शिरपाची ओळख, या गावाला फक्त 'फटिंग' म्हणूनच राहते...
असंख्य पात्रे आणि प्रत्येकाला स्वतंत्र अस्तित्व बहाल करण्याचं आव्हान पेलण्याचा यशस्वी प्रयत्न रायबोले यांनी या कादंबरीत केला आहे. ही कादंबरी वाचताना ग्रामीण विदर्भासह वऱ्हाडी बोलीतली अनेक वैशिष्ट्ये अस्सल ग्रामीण साहित्य वाचत असल्याचं समाधान देतात. गो. पु. रायबोले यांची ही पहिलीच कादंबरी आहे यावर विश्वास बसू नये इतक्या सहजतेने ही कादंबरी सचित्र ग्रामीण विदर्भ डोळ्यांपुढे उभा करते. मराठी साहित्यात ही कादंबरी नक्कीच दखलपात्र ठरेल असा विश्वास आहे.
