Payal Book
Peshwekalin Samaj aani Prashasan aani Prashasan ( पेशवेकालीन समाज आणि प्रशासन by Dr. G. B. Deglurkar डॉ. गो. बं. देगलूरकर
Couldn't load pickup availability
Peshwekalin Samaj aani Prashasan aani Prashasan ( पेशवेकालीन समाज आणि प्रशासन by Dr. G. B. Deglurkar डॉ. गो. बं. देगलूरकर
महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था, पुणे आणि अपरांत सादर करीत आहे डॉ. गो. बं. देगलूरकर, डॉ. अविनाश चाफेकर आणि डॉ. आनंद दामले लिखित “पेशवेकालीन समाज आणि प्रशासन”. छत्रपती शाहूमहाराजांनी इ.स. १७१३ मधे बाळाजी विश्वनाथ भट यांना स्वराज्याच्या पेशवेपदी नेमले आणि इ.स. १८१८ मधे हे मराठेशाहीचे राज्य ब्रिटिशांच्या ताब्यात गेले. ह्या सुमारे १०० वर्षांच्या काळात मराठेशाहीच्या राज्यातील सामान्य माणसाचे जीवन, समाज जीवन आणि प्रशासन व्यवस्था या बरोबरच धर्म, विविध सण आणि उत्सव, कुटुंब व्यवस्था, शिक्षण, वैद्यक, वाहतुक आणि संपर्क व्यवस्था, व्यापार आणि व्यवसाय, तत्कालीन बाजारभाव, नगर प्रशासन, देवस्थाने, महसूल, कायदा आणि न्याय व्यवस्था अशा अनेक गोष्टींबद्दलची मौलिक माहिती या पुस्तकातून समोर येणार आहे. तसेच या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे पेशवेकालीन कारभारातील जवळपास १२०० पेक्षा जास्त शब्दांचे अर्थ या पुस्तकात दिलेले आहेत. या शब्दार्थांचा अनेक नव्या-जुन्या अभ्यासकांना उपयोग होणार आहे.
