PAYAL BOOKS
Peshwekalin Prashasanik Marathi By Manojkumar M Suryawanshi पेशवेकालीन प्रशासनिक मराठी
Couldn't load pickup availability
Peshwekalin Prashasanik Marathi By Manojkumar M Suryawanshi पेशवेकालीन प्रशासनिक मराठी
प्रशासनातील मराठी, बोली भाषेतील मराठी आणि साहित्यातील मराठी वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला दिसते. कधी ती क्लिष्ट वाटते, जशी प्रशासनात असते आणि बोली भाषेतील तसेच साहित्यातील मराठी मोहवून टाकते. मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी आणि तिला जोपासण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरून प्रयत्न झाले आहेत, चालू आहेत. त्या दृष्टीने 'पेशवेकालीन प्रशासनिक मराठी लेखन : एक अभ्यास' या प्रबंधाचे विशेष महत्त्व आहे. श्री. मनोज सूर्यवंशी यांनी पेशवेकालीन ऐतिहासिक पत्रव्यवहारापासून सुरुवात करून अभ्यासाची दिशा निश्चित केली. पेशवेकाळात राज्यकारभाराची भाषा जरी मराठी असली तरी सततच्या फारसी संपर्काने कितीतरी नवनवीन शब्द मराठीत कसे सहज येऊन सामावले याची माहिती रंजक आहे. तसेच मुसलमान राजवटीबरोबर कितीतरी उर्दू शब्द मराठीचेच असल्यासारखे या भाषेत रुळले, याचीही माहिती या प्रबंधात आहे. या दोहोंबरोबर इंग्रजी अमलाखाली विधिमंडळाची बिले व कायदे प्रशासकीय मराठी यांच्यावर आंग्ल भाषा कशी परिणाम करीत गेली, ही माहिती मनोरंजक आहेच आणि भाषेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी मोलाची आहे.

