Skip to product information
1 of 2

Payal Books

Periyar By Dipak Gaikwad पेरियार दीपक गायकवाड

Regular price Rs. 400.00
Regular price Rs. 450.00 Sale price Rs. 400.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publicatios

Periyar By Dipak Gaikwad पेरियार  दीपक गायकवाड

एका योद्ध्यामध्ये असणारी आक्रमकता ही जर एका विचारवंतामध्ये उतरली, तर तो आपली विचारांची लढाई कसा लढतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे ई. व्ही. रामासामी उर्फ पेरियार. ‘पेरियार’ ही द्रविड जनतेने त्यांना त्यांच्या महान कार्याबद्दल दिलेली एक उपाधी आहे, जिचा अर्थ ‘महान व्यक्ती’ किंवा ‘आदरणीय व्यक्ती’ असा होतो. पेरियार यांच्या तत्त्वज्ञानाची महानता ते बहुसंख्य लोकांच्या किती कामी आले यावरून तोलायची ठरवली आणि पेरियार यांचे तत्त्वज्ञान एका पारड्यात व इतिहासातील इतर सर्व तत्त्ववेत्यांचे तत्त्वज्ञान दुसऱ्या पारड्यात ठेवून ते तोलले तर पेरियार यांच्या तत्त्वज्ञानाचेच पारडे अधिक जड होईल; इतके ते मानवजातीसाठी उपयोगाचे ठरणारे आहे. धर्माच्या परिघातून बाहेर पडून आणि नास्तिकतेचा धागा पकडून समाजसुधारणा घडवून आणणारे पेरियार हे देशातील त्यावेळचे एकमेव समाजसुधारक होते. त्यांनी आपल्या सुधारणा चळवळींनी दक्षिण भारतात जी क्रांती आणली, तशा प्रकारचे उदाहरण भारताच्या इतिहासात मागील दोन हजार वर्षांमध्येही सापडत नाही, असे गौरवोद्वार प्रसिद्ध अमेरिकन इतिहासकार जॉन रॅले यांनी पेरियार यांच्याविषयी काढले होते