Payal Books
Peril At End House | पेरिल अॅट एन्ड हाऊस Author: Madhukar Toradmal|मधुकर तोरडमल
Couldn't load pickup availability
खरं म्हणजे निक बकले हे एखाद्या सुंदर तरुणीचं नाव असावं हे विचित्रच. पण तिचं आयुष्य तरी कुठं सर्वसामान्य होतं? पहिल्यांदा कॉर्निशच्या डोंगरात धोकादायक रस्त्यावर तिच्या गाडीचे ब्रेक निकामी झाले होते. त्यानंतर समुद्राकाठच्या रस्त्यावर कोसळत्या दरडीखाली चिरडता चिरडता काही इंचांवरून ती वाचली. पुढे एक भव्य तैलचित्र भिंतीवरून तिच्या अंथरुणावरच कोसळलं.
तिच्या हॅटमध्ये बंदुकीच्या गोळीनं पाडलेलं छिद्र पाहिल्यावर पायरोला कळून चुकलं की तिला त्याच्या संरक्षणाची गरज आहे. त्याचवेळी एका न झालेल्या खुनाचे रहस्य तो सोडवू लागला. न झालेल्या म्हणजे... आतापर्यंत.
‘शोधलेला उपाय अतिशय कल्पक आहे.’
- टाइम्स लिटररी सप्लिमेंट
