पर्जन्यास्त्र हा विज्ञानकाल्पनिकांचा कथा संग्रह आहे . विज्ञानकथांमध्ये आता मराठी साहित्य बरेच प्रगत व विकसित झाले आहे . अभ्यासक्रमांतही विज्ञानसाहित्याचा समावेश केला जात आहे . तरीही काही मोजक्या लेखकांनी आपले वेगळे वैशिष्टे दर्शवणारे लेखन केले आहे . प्रा . म . दिवेकर हे अशाच निवडक विज्ञानकथा लेखकापैकी एक आहेत . प्रा . दिवेकरांची लेखणी विस्मय , नवल , गूढ , उत्कंठा अशा अनेक गोष्टीनी वाचकाला थक्क करते . विज्ञानजगतातील विलक्षण अदभुतततेची जाणीव करून देते . मानव आणि विज्ञान यांमधील एकत्रित अनुबंधाचा अनुभव देते . कधी कधी या कथा वाचताना आपण वेगवेगळ्याच जगात वावरत आहोत , याचा प्रत्यय वाचकाला करून देते. अशा विविधाअंगी वैशिष्ट्यासह या कथा वाचकाचे मनोरंजनही करतात . आजचे प्रगत विज्ञान आणि मराठी साहित्य यांच्या एकत्र व परस्परपूरक अश्या गोष्टीची नोंद घ्याची असेल तर प्रा . दिवेकरांच्या पर्जन्यास्त्र आणि यापूर्वीच्या विज्ञानकथांची दखल घ्यावी लागेल .
Parjanyastra | पर्जन्यास्त्र Author: M.V.Divekar
Regular price
Rs. 150.00
Regular price
Rs. 170.00
Sale price
Rs. 150.00
Unit price
per