स्पर्धात्मक युगात प्रत्येकालाच यशस्वी व्हायचं आहे; पण त्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. यश मिळवण्यासाठी परीक्षा देणं गरजेचंच! तेव्हा परीक्षेला घाबरून कसं चालेल? परीक्षेला घाबरणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आम्ही हे पुस्तक घेऊन आलोय. परीक्षा म्हणजे नेमकं काय, परीक्षेचं महत्त्व काय, हे समजलं की, परीक्षेची भीती नक्कीच कमी होईल. यासोबतच पुस्तकात अभ्यास म्हणजे काय, त्याचा पाया, पद्धत, अभ्यासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अशा विविध गोष्टी सांगितल्या आहेत. परीक्षेची पूर्वतयारी, परीक्षेचा ताण आणि त्याचं व्यवस्थापन, प्रत्यक्ष परीक्षेला सामोरं जाताना काय करायला हवं, याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं आहे. तसेच गणित, इंग्रजी, मराठी, इतिहास, भूगोल, विज्ञान अशा विविध विषयानुसार उपयुक्त टिप्सही दिल्या आहेत. विद्यार्थिदशेत उपयुक्त ठरणाऱ्या योगासनांची सचित्र पद्धतीदेखील प्रस्तुत पुस्तकात समाविष्ट आहे. मुलांची परीक्षा असली तरी पालकांना आपलीच परीक्षा असल्यासारखं वाटतं. मुलांच्या परीक्षेदरम्यान आपली भूमिका कशी असावी हे पालकांना या पुस्तकातून समजेल; तसेच परीक्षेदरम्यान मुलांना प्रेरणा मिळावी म्हणून प्रेरणादायी सुविचारांनी पुस्तकाचा समारोप करण्यात आला आहे. अशाप्रकारे विद्यार्थी आणि पालकांसाठी मार्गदर्शक असंच हे पुस्तक आहे. |
Payal Books
Parikshet Bharghos Yash Milnarach! | परीक्षेत भरघोस यश मिळणारच by AUTHOR :- Savita Jaju
Regular price
Rs. 88.00
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 88.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
