Payal Books
Pardhi Samaj : Lokjeevan Aani Loksanskruti | पारधी समाज : लोकजीवन आणि लोकसंस्कृती Author: Dr. Balasaheb Bale | डॉ. बाळासाहेब बळे
Couldn't load pickup availability
भारतीय समाजव्यवस्थेत पारधी समाजाचे अस्तित्व
अनादि कालापासून आहे,
त्यासंबंधीच्या अनेक कथा, मिथके, संदर्भ
पुराणकाळापासून उपलब्ध आहेत.
गावरहाटीपासून अलिप्त राहणार्या ह्या समाजाची
स्वतःची स्वतंत्र वैशिष्ट्ये आहेत.
त्यांचे लोकजीवन, लोकसंस्कृती, भाषा, सण-उत्सव, धार्मिक रूढी व
परंपरा, दैवते ह्यांविषयी माहिती प्रस्तुत पुस्तकात आहे.
पारधी समाजाची बोलीभाषा व त्यांची सांकेतिक भाषा,
समाजाचे जातवास्तव आणि जातपंचायत,
गावोगावी होणारे स्थित्यंतर ह्याची एकत्रित माहिती
ह्या ग्रंथात दिली आहे.
एकूणच पारधी समाजाचा सर्वांगीण अभ्यास करून
सिद्ध केलेला हा ग्रंथ मानवसमूहाच्या व समाजशास्त्राच्या
अभ्यासकांना उपयुक्त ठरेल.
एका उपेक्षित समाजाचे अंतरंग उलगडून दाखविणारा हा ग्रंथ
संग्राह्य आहे

