PAYAL BOOKS
Papyrus by Irene Vallejo पपायरस – आयरीन वालेहो प्रणव सखदेव
Couldn't load pickup availability
Papyrus by Irene Vallejo पपायरस – आयरीन वालेहो
प्रणव सखदेव
कागदाचा शोध लागला नसताना लेखन कसं केलं जायचं?
मौखिक शब्द अक्षररूपात कसे आले?
पुस्तकांनी मानवी जगण्याला आकार कसा दिला?
प्राचीन काळी नाइल नदीच्या किनारी उगवणाऱ्या पपायरस वनस्पतीपासून गुंडाळ्या अर्थात भूर्जपत्रं तयार केली जायची. त्यांपासून तेव्हाची पुस्तकं तयार व्हायची. या मौलिक उत्पादनाकरता भांडणं, लढाया व्हायच्या.
पुस्तक-निर्मिती आणि जतन करण्याची कहाणी जितकी अस्पष्ट आहे तितकीच ती नाट्यमय आहे. या कहाणीत रक्तपात आहे, राजकारण आहे, संघर्ष आहेत आणि पछाडलेपणही आहे. ती आपल्याला ॲलेक्झँडर द ग्रेटच्या युद्धसंग्रामात नेते. क्लिओपात्राच्या राजवाड्यांमधून फिरवून आणते. व्हेसूव्हियस ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जमिनीखाली गाडल्या गेलेल्या शहराचा शोध घ्यायला लावते. हायपाशियाचा खून का झाला असावा, असा प्रश्न विचारते...
आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय ठरलेल्या, विविध पुरस्कारप्राप्त ‘पपायरस’ पुस्तकामध्ये लेखिका आयरीन वालेहो यांनी प्राचीन काळातलं साहित्यिक जग, पुस्तकं जतन करण्यासाठी झालेले धाडसी प्रयत्न, तेव्हाची ग्रंथालयं, तिथल्या पद्धती यांचा मागोवा घेतला आहे. हे करताना त्यांनी पुस्तक-चोर, नकलाकार, ग्रंथपाल, पुस्तकविक्रेते, लेखक आणि श्रीमंत राजकारणी तसंच सर्वसामान्य गरीब लोक यांच्या विलक्षण कथा या कथनात गुंफल्या आहेत.
38पेक्षा जास्त भाषांमध्ये भाषांतरित झालेली ही पुस्तकांची, पुस्तकवेडाची, पुस्तकाच्या उत्क्रांतीची रंजक आणि कल्पक कहाणी!
