Panyashappath Bhag 2 by Pradip Purandare पाण्याशप्पथ : भाग २ प्रदीप पुरंदरे
Panyashappath Bhag 2 by Pradip Purandare पाण्याशप्पथ : भाग २ प्रदीप पुरंदरे
‘पाण्याशप्पथ’ हे प्रदीप पुरंदरे यांचे पुस्तक लोकवाङ्मय गृहाने जानेवारी २०१७ मध्ये प्रकाशित केले. या पुस्तकासाठी पुरंदरे यांना महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) या संस्थेचा २०२० या वर्षाचा ‘अपारंपरिक वैचारिक ग्रंथ पुरस्कार’ प्राप्त झाला. आता लोकवाङ्मय गृह ‘पाण्याशप्पथ’ या पुस्तकाचा दुसरा भाग ‘पाण्याशप्पथ : भाग २’ प्रकाशित करत आहे.
२०१७ ते २०२० या कालावधीत पाण्यासंदर्भात पुरंदरे यांनी जे लिखाण केले त्यातील निवडक लेखांचा समावेश ‘पाण्याशप्पथ: भाग २’ मध्ये केला आहे.
***
महाराष्ट्रातला सगळा जल-अडाणीपणा, जल-आत्मघातकीपणा सातत्याने लोकांपुढे मांडत बौद्धिक स्वातंत्र्य आणि सचोटी राखणारे, जपणारे एक महाभाग आहेत; प्रदीप पुरंदरे नावाचे. ते जलव्यवस्थापन कसे असावे ते सातत्याने सत्ताधाऱ्यांना मुळीच न भिता सांगत असतात. सरकारच्या, नियोजनकारांच्या चुका दाखवायला मुळीच घाबरत नाहीत आणि हे सगळे खुल्या, वृत्तपत्री लेखांमधून करतात की त्यांचा युक्तिवाद सर्व शाहण्या नागरिकांना समजावा.
भारतातल्या स्थापत्यशास्त्र शिक्षणात एक मोठा आणि मूलभूत दोष आहे. त्यात धरणे, सिंचन योजना, जलशुद्धीकरणाची संयंत्रे कशी आखायची, कशी बांधायची ते शिकवले जाते. ती कशी वापरायची, कशी चालवायची ते मात्र शिकवले जात नाही! अशा सर्व योजना एका कायद्याच्या चौकटीत योजल्या, रचल्या आणि चालवल्या जातात. ही कायद्याची चौकट मात्र स्थापत्य अभ्यासक्रमांमध्ये जाणवतही नाही. पुरंदरे सातत्याने लेख लिहून ही उणीव भरून काढायला धडपडतात आणि हेही सतत ठसवतात की हा सामान्य माणसांचा विषय आहे, केवळ तज्ज्ञांचा, अकादेमीय विद्वानांचा नाही.
– नंदा खरे (प्रस्तावनेतून)