Skip to product information
1 of 3

Payal Books

Pantila Japtana By Sameer Darekar पणतीला जपताना

Regular price Rs. 240.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 240.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

Pantila Japtana By Sameer Darekar पणतीला जपताना 

पणतीला जपताना...
लव्ह जिहाद : सामाजिक-राष्ट्रीय प्रश्नांचा साधार, साक्षेपी प्रतिवाद
    अनेकांना या ‘लव्ह जिहाद’ प्रश्नाचे अद्याप गांभीर्यच समजलेले नाही, ही सर्वात मोठी खेदाची गोष्ट आहे. अनेक जण हा प्रश्न काही विशिष्ट हिंदुत्ववादी संस्था-संघटनांनी बाऊ केलेला विषय असे मानून दुर्लक्ष करतात, ही आणखी क्लेशकारक गोष्ट आहे. या अशा पार्श्वभूमीवर ‘लव्ह जिहाद’चा विषय सांगोपांग, सविस्तर आणि सबळ पुराव्याच्या आधारे सजून घेण्यास समीर दरेकर यांचे ‘पणतीला जपताना...’ हे  पुस्तक झणझणीत नेत्रांजनासारखे आहे.

भारत हा प्राचीन काळापासून मूलतःच शांतिप्रिय व सहिष्णु देश आहे. हिंदू समाज हा या देशाचा अधिष्ठानरूप समाज असून या समाजाने आपल्या स्वभावानुरूप अनेक अल्पसंख्य विदेशी समाजांना त्यांच्या पंथ व उपासना पद्धतीसह स्थान व मान दिला आहे. पण, ‘जिहाद’ नावाखाली पूर्वी तलवारीच्या जोरावर धर्मप्रसार करणार्या धर्मांध मुस्लिमांनी आता ‘लव्ह जिहाद’द्वारे हिंदू मुलींचे इस्लाम धर्मांतरण करण्याचे षड्यंत्र रचले आहे. प्रेम, प्रेमविवाह हा व्यक्तिगत विषय आहे. पण, ‘लव्ह जिहाद’ भारताच्या सामाजिक स्वास्थ्याला सुरूंग लावणारा राष्ट्रीय प्रश्न आहे. हे साधार पुराव्यानुसार सिद्ध करून समाजाला जागृत करणारे नेत्रांजन म्हणजे समीर दरेकरांचे पुस्तक - ‘पणतीला जपताना...’ भारत देश हा अनेक प्रकारच्या विविधतेने नटलेला, संपन्न त्याचबरोबर प्राचीन देश आहे. अनेक भाषा, प्रांत, समाज, पंथ-संप्रदाय, चालीरिती, खाद्य, वेशभूषा अशी बहुविविधता हेच भारताचे पूर्वापार वैशिष्ट्य आहे. उदारता, सर्वसमावेशी सहिष्णुता ही भारतीय समाजाची जगभर ओळख आहे. पारशी, यहुदी अशा जगभर अपमानित झालेल्या अल्पसंख्य समाजाला सन्मानाने स्थान देणारा एकमेव देश म्हणून भारत विश्वप्रसिद्ध आहे. भारताचा हा पूर्वापार गौरव हा एका राष्ट्राचा गौरव आहे, तद्वत येथील अधिष्ठानरूप सकल हिंदू समाजाचा गौरव आहे. ‘एकम् सत विप्रा बहुधा वदन्ति’ या भारतीय-हिंदू चिंतनाचा, तत्त्वविचारांचा तो गौरव आहे. पण, अलीकडे सर्वधर्मसमभावाचे चुकीचे अर्थ करीत दांभिक राजकारण्यांनी व पक्षांनी आपल्या स्वार्थासाठी- सत्तेसाठी मुस्लीम तुष्टीकरणाच्या लांगूलचालन धोरणाने नव्या सामाजिक-राष्ट्रीय स्वरूपाच्या अनेक आत्मघाती संकटाला जन्म दिला आहे. त्या अनेक संकटांपैकी सध्या सर्वत्र चर्चिला जाणारा सामाजिक (राष्ट्रीय) प्रश्न म्हणजे लव्ह जिहाद!
अनेकांना या ‘लव्ह जिहाद’ प्रश्नाचे अद्याप गांभीर्यच समजलेले नाही, ही सर्वात मोठी खेदाची गोष्ट आहे. अनेक जण हा प्रश्न काही विशिष्ट हिंदुत्ववादी संस्था-संघटनांनी बाऊ केलेला विषय असे मानून दुर्लक्ष करतात, ही आणखी क्लेशकारक गोष्ट आहे. या अशा पार्श्वभूमीवर ‘लव्ह जिहाद’चा विषय सांगोपांग, सविस्तर आणि सबळ पुराव्याच्या आधारे सजून घेण्यास समीर दरेकर यांचे ‘पणतीला जाणताना...’ हे पुस्तक झणझणीत नेत्रांजनासारखे आहे, असे मला वाटते. अभिनव निर्माण प्रकाशन पुणे, या प्रकाशन संस्थेने खास समाजजागृतीसाठी ते पुस्तक एक सामाजिक बांधिलकी म्हणून प्रकाशित केलेले आहे. आजवर गेल्या वर्षभरात या पुस्तकाच्या १५ आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत, पण हे पुस्तक घरोघर वाचले जाण्याची व याच्या नव्या नव्या आवृत्त्या प्रकाशित होणे व समाजात पणतीविषयी जागृती-दक्षता निर्माण होणे, ही काळाची गरज आहे. दरेकर हे ‘बीई’ पदवीधर असून त्यांचा सामाजिक प्रश्नांचा अभ्यास, त्यासंदर्भातील वाचन, व्यासंग दांडगा आहे. ‘लव्ह जिहाद’ प्रश्नाची त्यांनी ज्या पद्धतीने मांडणी केली व लेखन केले, ते त्यांच्या व्यासंगाचे व सामाजिक तळमळीचे उत्कृष्ट दर्शन आहे. आपण पुस्तकाच्या विषयाकडे कोणताही पूर्वग्रह न ठेवता पाहा व प्रांजळपणे वाचन करा. मग तुम्हाला हा विषय तुम्ही समजता एवढा दुर्लक्ष करण्याचा नाही, हेच तुमच्या लक्षात येईल व या विषयांचे सामाजिक-राष्ट्रीय महत्त्वही पटेल. कदाचित तुम्हीही या पुस्तकाचे प्रशंसक होऊन जनजागृतीमध्ये सहयोग द्याल, असे मला वाटते. 
‘प्रेम’ ही एक पवित्र व मंगल आनंददायी गोष्ट आहे. पण, या गोष्टींचा धर्मांध मुस्लीम गैरफायदा घेत आहेत व त्याद्वारे छुप्या पद्धतीने इस्लामचा धर्मप्रचार करीत आहेत. हे कटूसत्य सध्या आपल्या देशाचे वास्तव आहे. केरळचे माजी मुख्यमंत्री ओमेन चंडी यांनी एका जाहीर पत्रकार परिषदेत या ‘लव्ह जिहाद’ संकटाची माहिती दिली असून इ. स. २००६ ते २०१२ या सहा वर्षांत केवळ एका केरळ प्रांतात ७,७१३ हिंदू मुलींचे ‘लव्ह जिहाद’द्वारे धर्मांतरण झाल्याचे सांगितले आहे. एवढेच नव्हे, तर जिल्हावार ‘लव्ह जिहाद’ची आकडेवारीही दिली आहे. (संदर्भ : जन्मभूमी वृत्तपत्र, केरळ) उच्च न्यायालय, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग भारत सरकार, बुद्धिस्ट असोसिएशन लडाख, अकाली दल अशा अनेकांनी या ‘लव्ह जिहाद’च्या सामाजिक प्रश्नांकडे-संकटाकडे लक्ष वेधलेले आहे. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’ हा केवळ हिंदुत्ववाद्यांचा कांगावा आहे, असे नसून तो एक ज्वलंत राष्ट्रीय प्रश्न, संकट आहे, हे आता निर्विवाद स्पष्ट झालेले आहे. त्याविषयी सर्व बाजूंनी समजून घेण्यास दरेकरांचे ‘पणतीला जपताना...’ हे पुस्तक एखाद्या गाईडसारखे आहे. दरेकरांनी पुस्तकाला अत्यंत समर्पक व सूचक नाव दिलेले आहे. ‘पण ती ला जपताना’या नावातून त्यांनी विषय नेमकेपणाने पोहोचविलेला आहे. हे पुस्तक त्यांनी मुस्लीम समाजातील सत्यशोधक समाजसुधारक हमीद दलवाई यांना व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अर्पण करून फार मोठे औचित्य दाखवले आहे. ३२८ पानांच्या या पुस्तकात दरेकरांनी ‘प्रेम, धर्मांतर आणि बरेच काही!’ या विषयाचा समग्र, साद्यंत, साधार आणि सहानुभूतीने विचार केला आहे. त्यांची भूमिका मात्र सडेतोड आहे आणि न्यायालयीन युक्तिवादाच्या धर्तीवर त्यांनी सर्व विषय वाचकांना समजेल, पटेल अशा पद्धतीने मांडलेला आहे. १६ छोटी-छोटी प्रकरणे आणि महितीपूर्ण परिशिष्टे असे पुस्तकाचे एकूण स्वरूप आहे. ‘कसलं  पुस्तक आहे गं?’ या घरगुती प्रश्नाच्या प्रकरणाने या पुस्तकाचा विषयारंभ होतो आणि ‘फसव्या प्रेमातून धर्मांतर’, ‘लव्ह जिहाद’, ‘तपास यंत्रणा - न्यायालयाची मते’, ‘करूण कहाण्या’, ‘दावत-ए-इश्क-का-दावत-ए-धर्मांतर’, ‘शरीरसंबंध : एक हत्यार’, ‘श्रद्धांचा कोंडमारा’, ‘इतिहास पाहा, लग्न करण्या आधी’, ‘फतव्यानुसार जगणार का?’, ‘दोन शब्द पालकांसाठी’, ‘मुलगी पळून गेल्यावर’, ‘भारताबाहेरची स्थिती’ या नावांच्या विविध प्रकरणातून एखाद्या शिक्षकाने समजावून द्यावे, तसे समीर दरेकर आपणास याविषयी साक्षर करतात.
 लेखक दरेकर यांचा प्रेमाला, प्रेमविवाहाला विरोध नाही. प्रेम आणि विवाह या वैयक्तिक-खासगी गोष्टी आहेत, हे त्यांना मान्य आहे. पण, त्यांचा विरोध ‘लव्ह जिहाद’ला आहे. कारण, या ‘लव्ह’मागे, प्रेमामागे मुस्लीम तरुणांची भावना पवित्र नसून फसवून मुलींचे इस्लाम धर्मात धर्मांतर करण्याची दुष्ट भावना आहे. त्या कामासाठी मुस्लीम युवकांना खास फंडिंग केले जाते. लग्नानंतर मुले होईपर्यंत मुस्लीम तरुण हिंदू पत्नीला जोधा अकबरप्रमाणे वागवतो, पण मुले होताच धर्मांतरणाची सक्ती करतो, दबाव आणतो, प्रसंगी छळ करतो, ‘तलाक’चे भय दाखवतो. मुस्लिमांना चार लग्नांची धार्मिक मुभा असल्याने त्या तरुणाचे या पत्नीविना काहीच अडत नसते. दरेकर सगळ्याच आंतरधर्मीय लग्नांना ‘लव्ह जिहाद’ म्हणत नाहीत, हेही लक्षात घ्यावे. अनेक मुस्लीम संस्थांनी ‘लव्ह जिहाद’च्या हिंदू मुलींच्या इस्लाम धर्मांतरणाचे समर्थन करणार्या पुस्तिका प्रकाशित केलेल्या आहेत. ऑनलाईन साहित्यही प्रसारित केलेले आहे. हे हिंदू पालक पाहू शकतात आणि आपल्या घरातील, कुटुंबातील, समाजातील ‘ती’ला जपू शकतात. तुम्ही आई, बहीण, मैत्रीण, बाबा, भाऊ, मित्र वा नातेवाईक कोणीही असा तुम्हाला आपल्या जवळच्या ‘ती’ला जपले पाहिजे, तिच्याच शाश्वत सुखासाठी. प्रेम-प्रेमविवाह हा खासगी विषय असला, तरी ‘लव्ह जिहाद’ हा खासगी विषय नसून सामाजिक व व्यापक अर्थाने राष्ट्रीय प्रश्न आहे. हे समजून घेण्यास उपयुक्त ठरणारे, सावध करणारे आणि लढायला दक्ष-सज्ज करणारे पुस्तक म्हणजे ‘पणतीला जपताना...’ ‘संभ्रमी पार्थास या गीते परी तू ज्ञान दे ।’ असे एक गीत-पद्य प्रसिद्ध आहे. ‘लव्ह जिहाद’च्या विषयाने संभ्रमित हिंदू समाजाला (पार्थाला) दरेकर यांनी ‘पणतीला जपताना...’ पुस्तकाद्वारे गीताज्ञान दिलेले आहे. वाचा, समजून घ्या, इतरांना सांगा, सावध व्हा, दक्ष राहा!
- विद्याधर ताठे
‘एकता’चे माजी संपादक

!