भारत सध्या अनेक आव्हानांचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत भगवान बुद्धांच्या उपदेशांचा तसेच तत्त्वांचा अनुनय करण्याची आणि संरक्षण करण्याची नितांत गरज आहे. माझ्या मते मोदी सरकार हे कार्य अत्यंत उत्तम पद्धतीने करत आहे.
– दलाई लामा
नोबेल पुरस्कारप्राप्त बौद्ध धर्मगुरू
निर्णयप्रक्रियेतील विरोधाभास आणि पारदर्शक व्यवहाराची कमतरता यांमुळेच गावांपर्यंत विकास पोहोचू शकत नाही. अशात देशाच्या विकासासाठी गुजरात मॉडेल नक्कीच उपयुक्त ठरते आहे. या मॉडेलच्या माध्यमातून ग्रामीण भागांमध्येही आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ पोहोचवण्यात मोठ्या प्रमाणावर यश येत आहे.
– डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
माजी राष्ट्रपती
महात्मा गांधींच्या तत्त्वांना अनुसरत गुजरात हे असे एकमेव राज्य बनले आहे, जिथे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आणण्यात यश मिळाले आहे.
– न्यायमूर्ती व्ही.आर.कृष्णन् अय्यर
माजी न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायालय
नरेंद्र मोदींचे नेतृत्व अनुकरणीय आहे. भारतासारख्या विशाल देशाचं उत्तम नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्यात आहे यात शंकाच नाही.
– रतन टाटा
माजी अध्यक्ष, टाटा समूह
अनेक वर्षांपासून गुजरातची जनता नरेंद्र मोदींना निर्णायक बहुमत देत आहे. देशाला यशोशिखरावर नेण्याचीही त्यांच्यात निश्चितच क्षमता आहे.
– नारायण मूर्ती संस्थापक, इन्फोसिस