Panpoi By V P Kale
Regular price
Rs. 117.00
Regular price
Rs. 130.00
Sale price
Rs. 117.00
Unit price
per
‘पाणपोई’तील काही काही हकिकती अगोदरच तुम्हाला माहीत असतील ही शक्यता डोळ्यांसमोर आहेच. त्याबरोबरच वैयक्तिक पातळीवरचे अनुभव तुम्हाला माहीत नसणं स्वाभाविक आहे. सगळेच वैयक्तिक अनुभव शब्दबद्ध करता येणार नाहीत. पण ज्या वैयक्तिक अनुभवांना सामाजिक आशयाचं कोंदण लाभू शकतं असे अनुभव तुमच्यापर्यंत पोचवायलाच पाहिजेत. किंबहुना हे एक प्रकारचं सामाजिक कार्यच आहे. जाणिवेने जगणाया प्रत्येक माणसाजवळ असे सांगण्यासारखे किस्से भरपूर असतील. ‘मी लेखक असतो तर हे सगळं लिहून काढलं असतं’ अशी विधानं करणारी अनेक माणसं वेगवेगळ्या लेखकांना भेटली असतील. अनुभवच जर विलक्षण असेल, सामाजिक पातळीला स्पर्श करायची ताकद त्यात असेल, तर ते अनुभव व्यक्त करण्याकरता लेखक व्हावंच लागतं असं नाही. तो अनुभवच लेखणीच्या टोकाशी उपस्थित असतो. म्हणून अनेकांना सांगावंसं वाटतं की, आनंद वाटायचा एवढाच संकल्प सोडा, शब्द आपोआप मागोमाग येतील. वपु‘पाणपोई’तील काही काही हकिकती अगोदरच तुम्हाला माहीत असतील ही शक्यता डोळ्यांसमोर आहेच. त्याबरोबरच वैयक्तिक पातळीवरचे अनुभव तुम्हाला माहीत नसणं स्वाभाविक आहे. सगळेच वैयक्तिक अनुभव शब्दबद्ध करता येणार नाहीत. पण ज्या वैयक्तिक अनुभवांना सामाजिक आशयाचं कोंदण लाभू शकतं असे अनुभव तुमच्यापर्यंत पोचवायलाच पाहिजेत. किंबहुना हे एक प्रकारचं सामाजिक कार्यच आहे. जाणिवेने जगणाया प्रत्येक माणसाजवळ असे सांगण्यासारखे किस्से भरपूर असतील. ‘मी लेखक असतो तर हे सगळं लिहून काढलं असतं’ अशी विधानं करणारी अनेक माणसं वेगवेगळ्या लेखकांना भेटली असतील. अनुभवच जर विलक्षण असेल, सामाजिक पातळीला स्पर्श करायची ताकद त्यात असेल, तर ते अनुभव व्यक्त करण्याकरता लेखक व्हावंच लागतं असं नाही. तो अनुभवच लेखणीच्या टोकाशी उपस्थित असतो. म्हणून अनेकांना सांगावंसं वाटतं की, आनंद वाटायचा एवढाच संकल्प सोडा, शब्द आपोआप मागोमाग येतील. वपु