Pandit Nehru : Ek Magova | पंडित नेहरू : एक मागोवा Author: N. G. Rajurkar/ Narhar Kurundkar| न. गो. राजूरकर / नरहर
या ग्रंथात लेखकांनी पंडित नेहरूंच्या जीवनाच्या प्रेरणांचा मागोवा घेतला आहे आणि स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा विकास व पोषण कसे झाले याची चर्चा केली आहे. संपूर्ण राष्ट्रीय स्वातंत्र्य, लोकशाही समाजवाद, निधर्मी राज्यरचनेची निष्ठा, मानवतेच्या न्यायावर आधारलेली समानता या पंडितजींच्या जीवनाच्या मूलभूत श्रध्दानिष्ठा होत्या. त्यांचे परिपोषण त्यांच्या जीवनात कसे कसे होत गेले याची अत्यंत विचारपूर्वक चर्चा या ग्रंथात आहे. हिंदुस्थानातील विशेषत: महाराष्ट्रातील शिक्षित समाज पंडितजींच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल नेहमीच आकर्षित झालेला होता. परंतु त्यांच्या काही बौद्धिक आशंका नेहमीच राहिलेल्या आहेत. या शंकांची पूर्ण मीमांसा - पूर्वपक्ष व उत्तरपक्ष दोन्ही देऊन या ग्रंथात केली आहे. - यशवंतराव चव्हाण