Skip to product information
1 of 2

Payal Books

Paishachi Goshta Cristina Benito क्रिस्टिना बेनितो, पैशाची गोष्ट

Regular price Rs. 200.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 200.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

पैसा आपल्याला भेडसावणारा प्रश्न किंवा आयुष्याचा आनंद लुटण्याच्या मार्गातला अडथळा बनू नये असं वाटत असेल तर… पैशाबद्दल स्पष्ट बोलायचं म्हटलं तर… ते काही सोपं नाही. खरंतर, पैसा म्हणजे इथून तिथून टाळण्याचाच विषय असतो. इतकच नव्हे, तर पैसा हा आपल्या जीवनातील एकमेव विषय नसला तरी, प्रमुख चिंतांपैकी एक विषय नक्कीच बनला आहे. आणि तसं पाहिल, तर पैसा हा स्वत:च, ना चांगला असतो ना वाईट असतो. तो आपल्याला बंदिस्त करून ठेवतो आहे की आपल्या स्वातंत्र्याची किल्ली बनतो आहे ह्या प्रश्नाचं उत्तर, आपले त्याच्याबरोबरचे संबंध कसे असतातं ह्यावर ठरत असतं. जर का पैशाबरोबरच्या आपल्या संबंधांची आपण पूर्णपणे जाणीव ठेवली आणि त्या संबंधाकडे पूर्णपणे लक्ष दिलं, तर आपण आपल्या वैयक्तिक संपत्तीबरोबर निकोप आणि सकारात्मक संबंध निर्माण करू शकतो; मग आपली मिळकत कितीही भरभक्कम असो किंवा कितीही तुटपुंजी असो.
क्रिस्टिना बेनितो ह्या लेखिकेचं ह्या पुस्तकामागचं तत्त्वज्ञानच ते आहे. सारं आयुष्यभर त्यांनी अर्थशास्त्रज्ञ आणि वित्तीय सल्लागार म्हणून काम केले. पैशाबरोबरच्या आपल्या संबंधांच्या पूर्ण जाणिवेच्या तत्त्वांची आणि आपल्या आयुष्यातील चांगल्या सवयींची गाठ घालून, त्या एक आगळीवेगळी पद्धत सादर करत आहेत. तीन टप्प्यांत विभागलेल्या ह्यापद्धतीमार्फत आपल्याला आपल्या जवळची रक्कम अधिक चांगल्या रीतीने हाताळता येते, आपल्या आयुष्यावर ताबा मिळवता येतो आणि काळज्यांचं आपल्या डोक्यावरचं ओझं हलकं करता येतं.