Padharo Mhare Des | पधारो म्हारे देस Author: Surekha Shaha
'पधारो म्हारे देस ' ही कादंबरी म्हणजे मराठी साहित्यातला काहीसा वेगळा सुहाना प्रयोग आहे . वैराग्य आणि भोगोपभोग , कला व कल्पना , रुळलेल्या वळण - वाटेवरचे जीवन आणि त्या पलीकडचंही काही , सूर आणि व्यथा , आभास व प्रेम , सत्य आणि स्वप्नीलता यांचं एक अजब मिश्रण या कादंबरीत सौ . सुरेखा शहा यांनी केलंय . |
या कादंबरीची पाश्वर्भूमी राजस्थानसारख्या मोहमयी , अनेकविध परंपरा , कला व इतिहास असलेल्या भूमीची आहे . तेथे काही काळासाठी गेलेल्या दोन्ही मैत्रिणींच्या जीवनाचे धागे तिथे गुंततात , गुंफले जातात आणि प्रसंगागणिक त्याचा सुरेख गोफ निर्माण होतो. |
राजस्थानची कला , लोकगीते , लोकनृत्ये , प्रथा , परंपरा , रोमांचक इतिहास , ग्रामीण जीवनाचे अनुनुभूत चित्रण या कादंबरीत दिसते . कादंबरी वाचताना वाचक त्यात हरवून जाईल हे निश्चित . आणि हेच ' पधारो म्हारे देसं ' च हुरहूर लावणारं यश आहे |