Payal Books
Outlive By Petera Attia आउटलिव्ह डॉ. पीटर अटिया
Couldn't load pickup availability
Outlive By Petera Attia आउटलिव्ह डॉ. पीटर अटिया
आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य अनुभवा
दीर्घायुष्य विषयातले प्रसिद्ध तज्ज्ञ डॉ. पीटर अटिया, तिशीत असताना स्वतः मॅरेथॉन जलतरणपटू होते. पण आपले आरोग्य अजिबात चांगले नाही आणि आपण हृद्रोगामुळे अकाली मरण्याच्या मार्गावर आहोत, हा आश्चर्यकारक शोध त्यांना लागला. यातूनच दीर्घायुष्यामागचे रहस्य शोधण्याची मोहीम त्यांनी हाती घेतली.
या प्रवासादरम्यान, आरोग्यसेवेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलत गेला, हे या पथदर्शी संहितेत डॉ. अटिया यांनी मांडलेले आहे. बहुतेक वेळा उपचार करायला उशीर झालेला असतो, तेव्हाच आरोग्यसेवा काम करू लागते. हा कालबाह्य मार्ग सोडून आपण व्यक्तिनिष्ठ, आणि ‘प्रो-अॅक्टिव्ह’ पद्धतीने दीर्घायुष्यासाठीचा आराखडा तयार केला पाहिजे, असे डॉ. अटिया आवर्जून सांगतात. कृती करायची वेळ हीच आहे, असे ते मानतात. हा मार्ग म्हणजे दोन-चार युक्त्या नसून तो ‘विज्ञानाधिष्ठित’ आहे. एकीकडे आयुर्मान वाढवत असताना शारीरिक, संज्ञानात्मक, आणि भावनिक आरोग्य सुधारणे हेसुद्धा यात अभिप्रेत आहे.
