Open: An Autobiography (Marathi) Author : Andre Agassi
आंद्रे आगासी - इतिहासातील अत्यंत लोकप्रिय क्रीडापटूंपैकी एक, टेनिस कोर्टावर पाऊल ठेवणार्याा गुणवान खेळाडूंपैकी एक. टेनिसमधील कौशल्यासाठी आणि यशासाठी ज्याचा मनस्वी हेवा करावा, असा हा आंद्रे आगासी त्याच्या लहानपणी याच टेनिसचा विलक्षण तिरस्कार करीत होता! पाळण्यातही त्याला खेळायला टेनिसची रॅकेटच दिली जात होती. प्राथमिक शाळेत असतानाच रोज शंभर चेंडू रॅकेटने मारण्याची सक्ती केली जात होती. एका बाजूला ‘लहान वयात मोठी कामगिरी करणारा असामान्य मुलगा,’ अशी ख्याती मिळवीत असताना दुसर्या बाजूला त्याच्या मनावर प्रचंड दबाव येत होता. त्याच्या मनात सतत चालणार्यास या संघर्षाने आंद्रे आगासीची शेवटपर्यंत सोबत केली. वाचकाला झपाटून टाकणार्यास या सुंदर आत्मकथेतही त्याने नुकसान करणारी अपूर्णता आणि तारक ठरणारी परिपूर्णता यांमधील त्याचा संघर्षच शब्दबद्ध केला आहे. प्रांजलपणा, मनमोकळा स्पष्टवक्तेपणा आणि टेनिसच्या खेळातल्या सारखीच वेगवान उत्सुकतावर्धक गती अशा टेनिसपटूची ही जीवनकहाणी वाचकाला नक्कीच चविष्ट वाटेल.