Skip to product information
1 of 2

Payal Books

One For The Road By V P Kale

Regular price Rs. 135.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 135.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
उभ्याआडव्या महाराष्ट्रातच नव्हे तर त्याबाहेरही मराठीचे प्रेम जेथे जोपासले जाते तेथेही, वसंत पुरुषोत्तम काळे हे नाव लोकप्रिय आहे. त्या नावाशी एक प्रतिमा निगडित आहे. देखणी, प्रसन्न, उत्साहवर्धक, ती कथाकथनकाराची. पण ती प्रतिमा म्हणजे त्यांच्या कथेचेच प्रतिबिंब आहे, इतकी ती कथा आणि तिचे लेखक आणि ती कथन करणारे कलावंत एकरुप झालेले आहेत. कथा पुण्यामुंबईच्या मध्यमवर्गी (आणि मध्यममागी) मराठी माणसाची. तिला ग्रामीण मेकअपचा सोस नाही, की अत्याधुनिकतेच्या होषात अंतर्मनात सूर मारून व्यथांचे पापुद्रे हाताळण्याचा (किंवा व्यथात सूर मारून अंतर्मनाचे पापुद्रे चिवडण्याचा). पण तिला आपला खास, अकृत्रिम ढंग आहे. ती साध्याही विषयात आशय शोधते, आणि तो विनोदाच्या अंगाने सजवते. तिला व्यथा वज्र्य नाही, पण तिचे फार कौतुककी नाही. ती ‘नॉर्मल’ माणसाची नॉर्मल कथा आहे. ती त्याला खुलवते, हसवते. सांसारिक आपदांचा विसर पाडते. म्हणून ती त्याला एवढी प्रिय. वसंत पुरुषेत्तम काळ्यांचा हा चोविसावा संग्रह. मं. वि. राजाध्यक्षउभ्याआडव्या महाराष्ट्रातच नव्हे तर त्याबाहेरही मराठीचे प्रेम जेथे जोपासले जाते तेथेही, वसंत पुरुषोत्तम काळे हे नाव लोकप्रिय आहे. त्या नावाशी एक प्रतिमा निगडित आहे. देखणी, प्रसन्न, उत्साहवर्धक, ती कथाकथनकाराची. पण ती प्रतिमा म्हणजे त्यांच्या कथेचेच प्रतिबिंब आहे, इतकी ती कथा आणि तिचे लेखक आणि ती कथन करणारे कलावंत एकरुप झालेले आहेत. कथा पुण्यामुंबईच्या मध्यमवर्गी (आणि मध्यममागी) मराठी माणसाची. तिला ग्रामीण मेकअपचा सोस नाही, की अत्याधुनिकतेच्या होषात अंतर्मनात सूर मारून व्यथांचे पापुद्रे हाताळण्याचा (किंवा व्यथात सूर मारून अंतर्मनाचे पापुद्रे चिवडण्याचा). पण तिला आपला खास, अकृत्रिम ढंग आहे. ती साध्याही विषयात आशय शोधते, आणि तो विनोदाच्या अंगाने सजवते. तिला व्यथा वज्र्य नाही, पण तिचे फार कौतुककी नाही. ती ‘नॉर्मल’ माणसाची नॉर्मल कथा आहे. ती त्याला खुलवते, हसवते. सांसारिक आपदांचा विसर पाडते. म्हणून ती त्याला एवढी प्रिय. वसंत पुरुषेत्तम काळ्यांचा हा चोविसावा संग्रह. मं. वि. राजाध्यक्ष