Omerta By Mario Puzo Translated By Anil Kale
Regular price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 225.00
Unit price
per
जन्मभर खास सिसिलियन पद्धतीनं भरपूर गुन्हे केल्यावर वृद्धपणी संघटित गुन्हेगारीतून आपल्या मान, प्रतिष्ठेला कुठेही तडा जाऊ न देता निवृत्त होण्याइतका डॉन एप्रिल निश्चितपणे दूरदर्शी आणि समयसूचक होता. मुलांना त्यानं गुन्हेगारी जगाचा वाराही लागू दिलेला नव्हता. त्यांचं संरक्षण व्हावं म्हणून त्यानं सिसिलीमधून एक पुतण्या दत्तक घेतला. त्याचं नाव `अॅस्टर व्हायोला`. डॉन रेमंड एप्रिलची गुन्हेगारीतून निवृत्ती म्हणजे इतर माफिया मिलींना आपले हातपाय पसरण्याची संधी होती, पण एफबीआयचा स्पेशल एजंट कुर्ट सिल्की मात्र तिकडे संशयाने पाहत होता. तेवढ्यात एक अतक्र्य घटना घडली... निवृत्त झालेल्या डॉन एप्रिलचा खून झाला! सिल्की आणि एफबीआयनं माफियाविरुध्द आणखी एक जोरदार मोहीम उघडली आणि अॅस्टर व्हायोला आणि डॉन एप्रिलची मुलं आणखी एका - शेवटच्या - युध्दात विनाकारण ओढली गेली. पण आता त्यांच्या मनात संभ्रम आहे - कायद्याच्या बाजूला नेमकं कोण आहे? आणि आपण काय करायचं?