Skip to product information
1 of 2

Payal Books

Nyaay Michael saddle Pradeep Biradar न्याय प्रदीप बिरादार

Regular price Rs. 319.00
Regular price Rs. 399.00 Sale price Rs. 319.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

खोटं बोलणं हे नेहमीच वाईट असतं का? व्यक्तिस्वातंत्र्याला काही मर्यादा असली पाहिजे का? अपवादात्मक परिस्थितीत एखाद्याचा खून करावा लागल्याचं समर्थन करता येऊ शकेल का? मुक्त बाजारपेठ खरंच मुक्त आहे का? विषमता कमी करण्यासाठी ठरावीक लोकांवर कर आकारण न्याय्य आहे का?

मायकल सँडेल या पुस्तकातून आपल्या प्रत्येकाला भेडसावणाऱ्या या रोजच्या आयुष्यातील नैतिक प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. यासाठी त्यांनी राजकीय तत्त्वज्ञानातील वेगवेगळे सिद्धान्त वाचकांसमोर अगदी सोप्या आणि दैनंदिन व्यवहारातील उदाहरणं देत उलगडून दाखवले आहेत. आजच्या काळातील मानवजातीसमोरील हे नैतिक पेच सोडवण्यासाठीची सँडेल यांची ही खास शैली बोजड राजकीय तत्त्वज्ञानाला रंजक तर बनवतेच शिवाय वाचकांनाही स्वतःची मूल्यव्यवस्था नव्याने तपासून पाहायला भाग पाडते. हे अवघड कार्य सँडेल इतक्या ओघवत्या शैलीत पार पाडतात की वाचकाला ही प्रकरणं म्हणजे आपल्या आवडत्या लेखकाचा कथासंग्रह नसून राजकीय तत्त्वज्ञानाचं रूक्ष अकादमिक लिखाण आहे, याचा विसर पडायला लागतो.