Skip to product information
1 of 2

PAYAL BOOKS

Nivdak Parikshane by digambar Padhye निवडक परीक्षणे दिगंबर पाध्ये

Regular price Rs. 538.00
Regular price Rs. 600.00 Sale price Rs. 538.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

Nivdak Parikshane by digambar Padhye  निवडक परीक्षणे  दिगंबर पाध्ये

दिगंबर पाध्ये यांनी ‘आलोचना’ मासिकात जी विविध परीक्षणे लिहिली त्यांमधून परीक्षण लेखनाचे त्यांना वाटणारे महत्त्व आणि या लेखनामागील गांभीर्य लक्षात येते. पाध्ये यांच्या परीक्षणलेखन पद्धतीची काही वैशिष्ट्ये सांगता येतील. सिद्धान्तन वा तत्त्वचर्चा यांचा अभ्यास असूनही वा त्यांचे महत्त्व गृहीत धरूनही साहित्यकृतीचे परीक्षण करताना पाध्ये अशा कोणत्याही चौकटीतून साहित्यकृतीकडे पाहत नाहीत. त्याऐवजी साहित्यकृतीचे स्वरूप म्हणजेच तिचे रूप आणि तिच्यातून व्यक्त झालेले जीवनविषयक भान लक्षात घेऊन साहित्यकृतीचे विवेचन करण्याकडे त्यांचा कल दिसून येतो. या दृष्टीने पाहताना जाणवलेले त्या त्या साहित्यकृतीचे गुणदोष पाध्ये तर्कशुद्ध विधानांच्या साहाय्याने स्पष्ट करतात. पाध्ये यांच्या परीक्षण लेखनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे साहित्यकृती ज्या प्रकारात बसते त्या प्रकारात तिचे मूल्यमापन करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. म्हणजे एखाद्या रंजक साहित्यकृतीचे परीक्षण करताना रंजक साहित्यकृती म्हणून ती कितपत यशस्वी ठरते याचे विवेचन पाध्ये करतात. त्यांच्या विविध परीक्षणांमधून त्या त्या साहित्यप्रकाराविषयीचे पाध्ये यांचे मर्मग्राही आकलनही व्यक्त होत राहते. या सर्व परीक्षणांची भाषा अनौपचारिक आणि तर्कशुद्ध असली तरीही ती किचकट वा बोजड होत नाही. गंभीर असूनही सहज आकलनक्षम अशा भाषेत पाध्ये त्या त्या साहित्यकृतीचे मर्म उलगडून दाखवतात. त्याच वेळी वाचकाचे साहित्यविषयीचे आकलन समृद्ध करतात.

‘आलोचना’ मासिकातील अशा काही निवडक परीक्षणांचा समावेश प्रस्तुत ग्रंथात केला आहे. मराठी साहित्यक्षेत्रातील अभ्यासकांच्या दृष्टीने ही परीक्षणे अत्यंत उपयुक्त ठरतील असा विश्वास आहे.

– डॉ. अरुणा श्री. दुभाषी